Covid-19: Israelis send message to India  Dainik Gomantak
ग्लोबल

Covid-19: इस्त्रायलने म्युझीकच्या माध्यमातून पाठविले भारतातला संदेश

Covid-19: शेकडो इस्त्रायली नागरिकांनी संगीत कार्यक्रमातून 'जिव्हाळ्याचे आणि भावनिक-संवेदनशील' संदेश पाठवले.

दैनिक गोमन्तक

कोरोनाव्हायरसच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेपासून सावरण्यासाठी शेकडो इस्त्रायली नागरिकांनी एका संगीत कार्यक्रमातून 'जिव्हाळ्याचे आणि भावनिक-संवेदनशील' संदेश पाठवले. या कार्यक्रमात भारतातील संगीतकारांनीही सहभाग घेतला. (Israelis send message to India to recover from the second wave of coronavirus through music)

भारतातील संगीतकारही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.

हा कार्यक्रम मंगळवारी रात्री तेल अवीव येथील हाबीमा चौकात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 'केशव माधव हरि हरि बोल' हे भक्तिगीतदेखील सादर करण्यात आले. हे गाणे अतीव भंसाली आणि आशिष रंगवानी यांनी गायले आहे. आयोजकांपैकी एक राज हेल्व्हिंग म्हणाले की, कोविड -19 च्या निमित्ताने गेल्या वर्षी भारताला भेट देणे शक्य नसल्यामुळे इस्रायलचे लोक भारतीय संस्कृती खूप आठवण करतात.

येथील जनतेचे आणि देशाचे संबंध नेहमीच चांगले आणि दृढ राहिले आहेत आणि लवकरच आम्ही भारत दौर्‍यावर येऊ शकू अशी आशा आहे. युनाइट इन बॅबिलोन 'सिंगिंग सर्कल' या मैफिलीचे आयोजन केले आहे ज्यात सर्व सहभागी संगीतकार गात आहेत आणि वाद्यही वाजवत आहेत. या दरम्यान, इस्रायलमधील काही लोकांनी हिब्रू, हिंदी आणि इंग्रजी भाषेतही गाणी गायली आणि वाद्ये वाजवली.

म्यानमार च्या रूईली शहरात वाढले कोरोना रूग्ण

म्यानमारच्या सिमेलगत असलेल्या चीनी शहर रूइली शहरात कोरोनाचा प्रसार वाढतांना दिसत असतांच लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की रुईलीमध्ये 24 तासांत कोरोनाची 15 प्रकरणे आढळली आहेत. या शहरात कोरोनाची सामूहिक चाचणी घेण्यात येत होती, त्यानंतर नवीन प्रकरणे सापडत आहेत. या कोरोना प्रकरणांमध्ये चीन आणि म्यानमार या दोन्ही देशांतील नागरिकांचा समावेश आहे.

अमेरिकेचा भूतान, श्रीलंका प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला

अमेरिकेने आपल्या नागरिकांना भूतान आणि श्रीलंका प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. श्रीलंकेतील दहशतवाद आणि भूतान मधले वाढते कोरोना संक्रमन बघता नागरिकांना प्रवासाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानेही आपल्या नागरिकांना श्रीलंकेत जाण्याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT