Covid 19: इंडोनेशियात कोरोना नियम मोडणाऱ्यांना दिली जातेय अनोखी शिक्षा

कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) सामना करण्यासाठी इंडोनेशियाने (Indonesian) बुधवारी देशव्यापी कोविड प्रतिबंधामध्ये वाढ केली आहे.
Indonesian Citizen
Indonesian CitizenDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) सामना करण्यासाठी इंडोनेशियाने (Indonesian) बुधवारी देशव्यापी कोविड प्रतिबंधामध्ये वाढ केली आहे. दैनंदिन कोरोना मृतांची संख्या वाढतच आहे, दुसरीकडे सरकारने चेतावणी दिली आहे की येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. नवीन कोविड निर्बंध देशातील बऱ्याच शहरांवर लागू होत पश्चिमेस सुमात्रा (Sumatra) बेटापासून पूर्वेस पापुआपर्यंत वाढणार आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे (Delta Variant) जावाच्या दाट लोकवस्तीच्या बेटात प्रचंड विनाश झाला आहे.आणि हाच व्हेरिएंट आता देशाच्या इतर बेटांवरही झपाट्याने पसरत आहे.

त्याच वेळी देशातील सेमारंग शहरात (Semarang) अग्निशमन विभागाने कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर पाण्याचा वर्षाव करण्यात येत आहे. परंतु काही लोक अद्याप नियम तोडत आहेत. सरकारमधील ज्येष्ठ मंत्री एरंगा हार्तेर्टो (Eranga Harterto) म्हणाले की, इतर क्षेत्रातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वाढत आहे. आम्हाला कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता पहावी लागत आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, सरकारने 20 जुलैपर्यंत निर्बंध वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या बरीच वाढली आहे.

Indonesian Citizen
ब्राझीलमध्ये लसखरेदी गैरप्रकाराविरोधात देशव्यापी आंदोलन

दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांपर्यंत पोहोचत आहे

या आठवड्यात सरकारने सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या राजधानी जकार्ता, जावा, आणि बालीच्या हॉलिडे बेटावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी नवे निर्बंध लागू केले आहे. मंगळवारी इंडोनेशियात 31,189 नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर 728 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्या सात पट जास्त आहे. येत्या काही दिवसांत इंडोनेशियामध्ये एका दिवसात 50 हजारांपर्यंत रुग्ण आढळू शकतात, असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. अनेक ठिकाणी नवे निर्बंध केले आहेत जावाच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या ही खूपच कमी आहे. जावा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून उदयास आला आहे.

Indonesian Citizen
Covaxin 77.8 टक्के प्रभावी; भारत बायोटेकने केला दावा

कोरोनामुळे एक हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी गमावला जीव

इंडोनेशियातील कोरोनाची परिस्थिती इतकी बिकट आहे की, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर ज्यांना कोविड प्रतिबंध लस देण्यात आली त्यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येत चालला आहे. देशाच्या मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे एक हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये असे अनेक नागरिक आहेत, ज्यांना पहिल्यांदा कोरोनाची लस देण्यात आली होती. नव्या निर्बंधांतर्गत जावा येथे कार्यालये, मशिदी, उद्याने, शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करण्यात आली आहेत. तथापि, यानंतरही कोरोना नियमांना नागरिक तिलांजली देत असल्याच्या अनेक अनेक घटना समोर आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com