Naftali Bennett dainik gomantak
ग्लोबल

इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांना कोरोनाची लागण; 5 दिवसांवर आहे भारत दौरा

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना कोरोनाची लागण

दैनिक गोमन्तक

जेरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 2 एप्रिल, 2022 रोजी भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान बेनेट यांची भेट झाली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान बेनेट यांना भारताच्या अधिकृत भेटीसाठी आमंत्रित केले होते. आता त्यांच्या दौऱ्याला फक्त 5 दिवस उरले असतानाच पंतप्रधान बेनेट यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान बेनेट यांचा भारत दौरा ३ एप्रिल ते ५ एप्रिल या कालावधीत प्रस्तावित आहे. (Israeli Prime Minister Naftali Bennett has tested positive)

दरम्यान पंतप्रधान बेनेट यांनी नुकतीच अमेरिकेचे (America) परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांची भेट घेतली होती. तर पंतप्रधान बेनेट यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर ते बरे असल्याचे त्यांच्या कार्यालयाच्या वतीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. तसेच त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले असून ते घरूनच काम हाताळत आहेत.

तर इस्रायलचे पंतप्रधान बेनेट हे ३-५ एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येत असून दोन्ही देशांदरम्यान नावीन्य आणि तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, कृषी आणि हवामान बदल यासह सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तर ते भारतात (India) ज्यू समुदायाचीही भेट घेणार आहेत. मात्र, आता पंतप्रधान बेनेट (Israeli Prime Minister Naftali Bennett's) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा हा दौरा रद्द होण्याची किंवा तो पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT