जेरुसलेम : भारत-इस्त्रायल संबंध परस्पर हे सहकार्यावर आधारित आहेत. तर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 30 वर्ष होत आहेत. याचे औचित्यसाधत आपण भारत दौऱ्यावर जाणार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी म्हटले आहे. तसेच या भेटीचा उद्देश हा दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान, सुरक्षा आणि सायबर आणि कृषी आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे आहे. तसेच ते भारतात ज्यू समुदायाचीही भेट घेणार आहेत. (Israeli Prime Minister Naftali Bennett's visit to India on April)
पंतप्रधान नफ्ताली बेनेट (PM Naftali Bennett) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निमंत्रणावरून 2 एप्रिल, 2022 रोजी भारताचा पहिला अधिकृत दौरा करणार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान (Climate) बदल परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान बेनेट यांची भेट झाली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान बेनेट यांना भारताच्या अधिकृत भेटीसाठी आमंत्रित केले होते, असे इस्रायलच्या पंतप्रधानांच्या परराष्ट्र माध्यम सल्लागाराने एका निवेदनात म्हटले आहे.
दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 30 वर्ष होत आहेत. त्याअनुशंगाने ही भेट होत आहे. पंतप्रधान बेनेट यांचा 2 ते 5 एप्रिल असा चार दिवसांचा दौरा असेल. तर या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमधील सामरिक शक्ती अधिक मजबूत करणे आणि द्विपक्षीय संबंधांचा विस्तार करणे असल्याचे माध्यम सल्लागार म्हणाले. याशिवाय, दोन्ही नेते अर्थव्यवस्था (Economy), संशोधन आणि विकास, कृषी (Agriculture) आणि इतरांसह विविध क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा करतील.
तसेच पंतप्रधान बेनेट हे भारताच्या या दौऱ्यात वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि स्थानिक ज्यू (Jews) समुदायाच्या सदस्यांची भेट घेतील. या भेटी संदर्भातील संपूर्ण तपशील स्वतंत्रपणे जाहीर केले जातील, असे ही निवेदनात म्हटले आहे. तसेच यावेळी पंतप्रधान बेनेट यांनी, 'माझे मित्र, पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून मला माझी पहिली अधिकृत भारत भेट घेताना आनंद होत आहे. आम्ही एकत्र येऊन दोन्ही देशांमधील संबंध पुढे नेत राहू' असे एका निवेदनात म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान बेनेट यांनी, मोदींनी भारत आणि इस्रायलमधील संबंध पुन्हा सुरू केले आणि त्याला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे म्हटले आहे. आपल्या दोन अद्वितीय संस्कृती - भारतीय संस्कृती (Indian culture) आणि ज्यू संस्कृती यांच्यातील संबंध खोल आहेत. ते सहकार्यावर आधारित आहेत. आम्ही भारतीयांकडून अनेक गोष्टी शिकू शकतो आणि तेच करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान बेनेट यांनी आवर्जून सांगितले. आम्ही एकत्रितपणे नावीन्य आणि तंत्रज्ञान, सुरक्षा आणि सायबर, कृषी आणि हवामान बदल यासारख्या क्षेत्रात आमचे सहकार्य वाढवू असेही पंतप्रधान बेनेट यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.