Israeli people Dainik Gomantak
ग्लोबल

Benjamin Netanyahu: नेतन्याहूंविरोधात इस्रायली जनता रस्त्यावर; तात्काळ निवडणुका घेण्याची होतेय मागणी

Israeli PM Benjamin Netanyahu: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये.

Manish Jadhav

Israeli PM Benjamin Netanyahu: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आता त्यांच्याच देशात विरोध होऊ लागला आहे. युद्ध सुरु असताना नेतन्याहू यांच्याविरोधात ही निदर्शने होत आहेत.

दरम्यान, राजधानी तेल अवीवमध्ये शुक्रवारी रात्री हजारो लोकांनी पंतप्रधान नेतन्याहू यांच्या सरकारविरोधात रॅली काढली. निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी इस्रायलमध्ये तात्काळ निवडणुका घेण्याची मागणी केली. सरकार केवळ स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी काही आंदोलकांनी जाळपोळही सुरु केली, तर इतर आंदोलक देशभक्तीपर गाणी गात होते. विशेष म्हणजे, नेतन्याहू यांच्यावर टीका करणारे फलकही आंदोलकांच्या हातामध्ये दिसले.

दुसरीकडे, आंदोलकांनी देशाच्या एका कानाकोपऱ्यातच नव्हे तर शहराच्या इतर भागातही आंदोलन केले. आंदोलकांनी यावेळी हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, आंदोलकांनी 'ओलिसांना घरी आणा' अशा घोषणा दिल्या. दरम्यान, हमाससोबतच्या युद्धविरामासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये सातत्याने निदर्शने सुरु आहेत. इस्रायली जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि लोक या सर्व गोंधळासाठी पंतप्रधान नेतन्याहू यांना जबाबदार धरत आहेत. नेतन्याहू यांनी हमासचा नाश करण्याची शपथ घेतली आहे. हमास ओलिसांची सुटका करेपर्यंत युद्धविराम मागे घेतला जाणार नाही, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

दरम्यान, इस्रायल हमासवर सातत्याने हल्ले करत आहे. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांमुळे गाझामधील काही भाग उद्ध्वस्त झाला आहे, ज्यामध्ये अनेक नागरिकांसह सुमारे 30 हजार लोक मारले गेले आहेत. इस्रायली आकडेवारीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले, ज्यात बहुतांश नागरिक होते. हमासने 253 ओलिसांनाही पकडले, जरी नोव्हेंबरच्या उत्तरार्धात युद्धविराम दरम्यान त्यापैकी 100 हून अधिक लोकांना सोडण्यात आले. हमासच्या 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर नेतन्याहू यांची लोकप्रियता ओपिनियन पोलमध्ये घसरली आहे, ज्यांनी गाझामध्ये विनाशकारी इस्रायल-हमास युद्धाला सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT