Israeli forces will enter Gaza City in the next 48 hours and a very dangerous ground operation will then begin. Dainik Gomantak
ग्लोबल

Israel - Hamas War 2023: 48 तासांत इस्रायली सैन्य पोहचणार गाझा सिटीत, धोकादायक ग्राउंड ऑपरेशनच्या भीतीने हमास सैरभैर

Israel - Hamas War 2023: गाझामधील हमास-नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 9,700 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, ज्यामध्ये 4,000 हून अधिक मुले आणि अल्पवयीन आहेत.

Ashutosh Masgaunde

Israeli forces will enter Gaza City in the next 48 hours and a very dangerous ground operation will then begin: मानवतावादी युद्धविरामाच्या आवाहनादरम्यान, गाझा पट्टीमध्ये इस्रायली बॉम्बफेक वाढत आहे, यावरून स्पष्टपणे दिसून येते की इस्रायल कोणाचेही ऐकणार नाही.

जागतिक दबावाखाली इस्रायलला युद्धविराम करावा लागेल असा हमासचा विचार होता. हा जुगार महागात पडत आहे. आता हमासचे दहशतवादी लपून बसलेल्या निर्वासितांच्या छावण्यांना इस्रायली लष्कर लक्ष्य करत आहे.

हमास-नियंत्रित गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, आदल्या दिवशी गाझामधील दोन निर्वासित शिबिरांवर इस्रायली हवाई हल्ल्यात अनेक लोक मारले गेले आहेत.

दरम्यान, इस्रायली मीडियाने वृत्त दिले आहे की, इस्रायली सैन्य पुढील 48 तासांत गाझा शहरात प्रवेश करेल आणि त्यानंतर एक अतिशय धोकादायक ग्राउंड ऑपरेशन सुरू होणार आहे. त्यामुळे हमास सैरभैर झाले आहे.

दुसरीकडे, इस्रायली सैन्याने गाझा शहराला वेढा घातल्याची आणि वेढलेल्या किनारपट्टीचे दोन भागांमध्ये विभाजन केल्याची घोषणा केल्यानंतर एका महिन्यात तिसऱ्यांदा गाझामधील दूरध्वनी संपर्क खंडित झाला आहे.

गाझामधील हमास-नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 9,700 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, ज्यामध्ये 4,000 हून अधिक मुले आणि अल्पवयीन आहेत.

त्याच वेळी, इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये हिंसाचार आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये 140 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आज अंकारा येथे तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

हमासचा खात्मा केला नाही, तर पुन्हा इस्रायलवर हल्ला करू शकते, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी अरब नेत्यांना सांगितले आहे. त्याचवेळी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांनी ओलीसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगात बंद असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांची सुटका करण्याची अटही फेटाळली आहे.

नेतान्याहू यांनी स्पष्टपणे सांगितले की "ओलिसांना परत केल्याशिवाय युद्धविराम होणार नाही."

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सोमवारी इस्रायल आणि गाझामधील हिंसाचारावर बैठक घेणार आहे, असे वृत्त सिक्युरिटी कौन्सिल रिपोर्ट (SCR) वेबसाइटने दिले आहे.

सुरक्षा परिषदेच्या 10 निवडून आलेल्या सदस्यांनी मांडलेल्या इस्रायल आणि गाझावरील नवीन ठरावावर परिषदेचे सदस्य बैठकीत विचार करू शकतात, असे SCR ने म्हटले आहे.

युद्धविराम किंवा मानवतावादी विराम देण्याचे आवाहन करणारे चार ठराव आधीच परिषदेच्या स्थायी सदस्यांनी व्हेटो केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT