Viral Video: क्रोएशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आगाऊपणा! महिला जर्मन मंत्र्याचे घेतले जबरदस्ती चुंबन

European Union Kiss: आतापर्यंत जर्मनीचे परराष्ट्र मंत्री बेरबॉक यांनी या घटनेवर भाष्य केलेले नाही. मात्र, जर्मन मीडियाने याला 'किस अटॅक' असं म्हटलं आहे.
Croatian Foreign Minister Gordon Grlic Radman and German Foreign Minister Annalena Baerbock.
Croatian Foreign Minister Gordon Grlic Radman and German Foreign Minister Annalena Baerbock.Dainik Gomantak
Published on
Updated on

Croatian Foreign Minister Gordon Grlic Radman kisses German foreign minister Annalena Baerbock at a meeting of the European Union, sparking controversy:

युरोपियन युनियनच्या बैठकीत क्रोएशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अ‍ॅनालेना बेअरबॉक यांचे चुंबन घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. प्रचंड टीकेनंतर क्रोएशियन परराष्ट्र मंत्री गॉर्डन ग्रलिक रॅडमन यांनी माफी मागितली आहे.

क्रोएशियन मीडियानुसार, रॅडमन म्हणाले, "कदाचित तो एक अस्ताव्यस्त क्षण होता. जर कोणाला त्यात काही वाईट दिसले असेल, तर मी माफी मागतो."

क्रोएशियाचे परराष्ट्र मंत्री गॉर्डन ग्रलिक रॅडमन हे युरोपियन युनियनच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते.

यादरम्यान, ग्रुप फोटो सत्रादरम्यान, त्यांनी आपल्या परराष्ट्र मंत्री अ‍ॅनालेना बेरबॉक यांच्या गालाचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. यावेळी बेअरबॅक यांनी आपले तोंड फिरवून हा प्रकार टाळण्याचा प्रयत्न केला.

रॅडमन यांची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोहोचताच एकच खळबळ उडाली. लोकांनी क्रोएशियन परराष्ट्र मंत्र्यांवर खूप टीका केली.

Croatian Foreign Minister Gordon Grlic Radman and German Foreign Minister Annalena Baerbock.
Elvish Yadav Video: "मी सोडणार नाही", साप तस्करीच्या आरोपावरून एल्विश यादवची मेनका गांधींना धमकी

सुरुवातीच्या गदारोळानंतर, ग्रॅलिक रॅडमन यांनी आपल्या कृतीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की, समस्या काय आहे हे मला माहित नाही... आम्ही नेहमी एकमेकांचे स्वागत करतो. सहकार्‍याबद्दल ही एक उबदार मानवी वृत्ती आहे. ते चुकीच्या पद्धतीने का घेतले जात आहे ते माहित नाही.

मात्र, नंतर वाद वाढत गेल्यावर त्यांनी माफी मागितली. रॅडमन यांनी नंतर सांगितले की, त्यांना लगेच लक्षात आले नाही की, त्यांनी आपल्या जर्मन समकक्षाला अती मैत्रीपूर्ण वागणूक देऊन लाजवले असावे.

आतापर्यंत जर्मनीचे परराष्ट्र मंत्री बेरबॉक यांनी या घटनेवर भाष्य केलेले नाही. मात्र, जर्मन मीडियाने याला 'किस अटॅक' असं म्हटलं आहे.

जर्मन टॅब्लॉइड वृत्तपत्र बिल्डने प्रथम या घटनेचे वृत्त दिले. बिल्डच्या मते, बेअरबॉकच्या जवळच्या लोकांनी सांगितले की एकमेकांना पटकन अभिवादन करण्याचा हा एक विचित्र प्रयत्न होता.

Croatian Foreign Minister Gordon Grlic Radman and German Foreign Minister Annalena Baerbock.
Mahadev App: महादेवसह २२ बेकायदेशीर अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक

क्रोएशियातील समीक्षकांनी रॅडमन यांच्यावर जर्मन सरकारी अधिकाऱ्याला जाहीरपणे लाजवल्याचा आणि स्वतःच्या देशाला लाज आणल्याचा आरोप केला. 2009 ते 2011 या काळात क्रोएशियाचे पंतप्रधान राहिलेल्या जद्रंका कोसोर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून याला हिंसाचाराचा प्रकार म्हटले आहे.

क्रोएशियामधील नागरिकांनी या घटनेचे वर्णन "लैंगिक छळ" असे केले. प्रख्यात क्रोएशियन महिला हक्क कार्यकर्त्या राडा बोरिक यांनी मंत्र्यांच्या या कृतीचे वर्णन 'अयोग्य' म्हणून केले आणि म्हटले की 'उबदार अभिवादन' फक्त अशा लोकांमध्येच व्हायला हवे ज्यांचे संबंध चुंबन घेण्यास परवानगी देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com