Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: गाझामध्ये इस्रायलचे हल्ले तीव्र, एकाच कुटुंबातील 76 जणांचा मृत्यू!

Israel-Hamas War: गाझामध्ये इस्रायली लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील 76 जणांचा मृत्यू झाला. मदत आणि बचाव कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझामध्ये इस्रायली लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील 76 जणांचा मृत्यू झाला. मदत आणि बचाव कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. याच्या एक दिवस आधी, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी पुन्हा इशारा दिला होता की, गाझामधील कोणतीही जागा आता सुरक्षित नाही आणि इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे लोकांपर्यंत मानवतावादी मदत पोहोचवण्यात मोठे अडथळे येत आहेत. गाझाच्या नागरी संरक्षण विभागाचे प्रवक्ते महमूद बस्सल यांनी सांगितले की, गाझामधील एका इमारतीवर शुक्रवारचा हल्ला हा इस्रायल-हमास युद्धातील सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक होता.

दरम्यान, गेल्या 12 आठवड्यांपासून हे युद्ध सुरु आहे. महमूद बस्सल यांनी हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या नावांची आंशिक यादी प्रदान केली, ज्यात अल-मुग्राबी कुटुंबातील 16 घरांच्या प्रमुखांचा समावेश आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मृतांमध्ये युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामचे अनुभवी कर्मचारी इसाम अल-मुगराबी, त्यांची पत्नी आणि त्यांच्या पाच मुलांचा समावेश आहे. हमास या दहशतवादी गटाचा खात्मा करण्यासाठी इस्रायलने गाझामध्ये सुरु केलेल्या युद्धात आतापर्यंत 20,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाझा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

दुसरीकडे, इस्रायलने गाझामध्ये हल्ले तीव्र केले असून लाखो लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. गाझामधील मृत्यू हे युद्धापूर्वीच्या प्रदेशातील लोकसंख्येपैकी सुमारे एक टक्के आहे. इस्रायलची अलीकडील इतिहासातील सर्वात विनाशकारी लष्करी कारवाईंपैकी एक आहे, ज्यामुळे गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकसंख्येपैकी 85 टक्के लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास भाग पाडले गेले. संयुक्त राष्ट्र आणि इतर संस्थांनी गुरुवारी जारी केलेल्या अहवालानुसार, गाझामध्ये अर्धा दशलक्षाहून अधिक लोक उपासमारीला सामोरे जात आहेत.

तसेच, इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासने सुमारे 1200 लोक मारले आणि सुमारे 240 लोकांचे अपहरण केले. इस्रायलने हमासचा नाश होईपर्यंत आणि गाझामधील सत्तेपासून दूर होईपर्यंत आणि सर्व ओलीसांची सुटका होईपर्यंत लढाई सुरु ठेवण्याचे वचन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: "कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक"

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

ड्रोनने ठेवली जाणार Iffi, Exposition वर नजर; 1,500 पोलिस, IRB फोर्स तैनात! पर्यटन सुस्साट, हॉटेल्स फुल्ल!

Keerthy Suresh Wedding: कीर्ती सुरेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय; 'या' दिवशी प्रियकरासोबत गोव्यात बांधणार लग्नगाठ

IFFI 2024: In Conversation मध्ये दिग्गजांची मांदियाळी! रेहमान, मणीरत्नम, रणबीरसोबत खुला संवाद

SCROLL FOR NEXT