Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्त्रायली हल्ल्यात एकाच दिवसात 110 पॅलेस्टिनी ठार, हवाई हल्ले सुरुच!

Israel Hamas War: गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, एकाच दिवसात हवाई हल्ल्यात 110 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

Manish Jadhav

Israel Hamas War: गाझामध्ये इस्रायलचे हवाई हल्ले सुरुच आहेत. गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, एकाच दिवसात हवाई हल्ल्यात 110 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. एका निवेदनात मंत्रालयाने सांगितले की, जबलिया येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर 50 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले होते की, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर सुरु झालेल्या इस्रायली मोहिमेत आतापर्यंत 18,800 लोक मारले गेले आहेत.

दरम्यान, काल रात्री इस्रायलने ज्या ठिकाणाला लक्ष्य केले त्या ठिकाणी तीन कुटुंबे राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापही मदत पोहोचलेली नाही. अशा स्थितीत तिथे उपस्थित असलेले लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे सर्वसामान्यांना मदत करत आहेत. इस्रायली सैन्य गेल्या दोन आठवड्यांपासून जबलियाला लक्ष्य करत आहे. इथे त्यांनी शरणार्थी छावणीला सर्व बाजूंनी वेढले आहे. दुसरीकडे, इस्त्रायली लष्करानेही जबलियावरील हल्ल्याबाबत वक्तव्य केले आहे. यानुसार इस्त्रायली लष्कर हल्ल्याची योजना आखताना पूर्ण तयारी करते. विशेष म्हणजे, अॅडव्हान्समध्ये इशाराही दिला जातो.

दुसरीकडे, या दिवसांत इस्रायलने आपल्याच तीन नागरिकांवर गोळीबार केला. दरम्यान, हमासचा सर्वात मोठा बोगदा सापडल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, हा बोगदा चार किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. IDF ने सोशल मीडिया साइट X वर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात म्हटले की, बोगद्याची एन्ट्री इरेज क्रॉसिंगपासून फक्त 400 मीटर (1,310 फूट) वर होती. इरेझ क्रॉसिंगमुळे गाझाच्या लोकांना इस्रायलमध्ये काम करण्यासाठी आणि इस्रायली रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यास परवानगी मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT