Israel Lebanon Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Lebanon Conflict: "गाझासारखचं लेबनॉनही उद्ध्वस्त करणार!" इस्रायली संरक्षण मंत्र्यांची गर्जना; हिजबुल्लाचा 10 वर्षांचा प्लॅन धुळीला VIDEO

IDF Underground Operations Lebanon: इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धबंदी लागू झालेली असतानाही दक्षिण लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा थरार पाहायला मिळाला.

Manish Jadhav

IDF Underground Operations Lebanon: इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धबंदी लागू झालेली असतानाही दक्षिण लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा थरार पाहायला मिळाला. इस्रायली संरक्षण दलाने दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचे महाकाय आणि अत्याधुनिक भुयारी जाळे स्फोट घडवून उद्ध्वस्त केले. या स्फोटाचे दृश्य इतके भीषण होते की, संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट आणि कंपने जाणवली.

इस्रायलचे (Israel) संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी यावेळी कडक शब्दांत इशारा दिला असून दक्षिण लेबनॉनची अवस्थाही गाझा पट्टीसारखीच केली जाईल, असे विधान केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली.

इस्रायली सैन्याने 'X' वर एक धक्कादायक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये हिजबुल्लाने जमिनीखाली तयार केलेले दोन किलोमीटर लांबीचे भुयारी साम्राज्य दिसत आहे. ही भुयारे बांधण्यासाठी हिजबुल्लाला तब्बल 10 वर्षांचा काळ लागला होता, असा दावा इस्रायलने केला. या भुयारांमध्ये इस्रायली सैन्याला स्नायपर गन, शक्तिशाली स्फोटके आणि मोठ्या प्रमाणावर आधुनिक शस्त्रसाठा सापडला. गॅलीली भागातील इस्रायली नागरिकांना धोका निर्माण करण्यासाठी ही भुयारे वापरली जाणार होती, असे तपासात समोर आले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे स्पष्ट केले की, "आम्ही हिजबुल्लाचे दहशतवादी जाळे पूर्णपणे उखडून टाकत आहोत, त्यांचे शेकडो दहशतवादी मारले गेले असून आमची ही कारवाई अशीच सुरु राहील."

संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सांगितले की, पंतप्रधान नेतन्याहू यांनी आयडीएफला 'ब्लू लाईन'पर्यंतच्या सुरक्षा क्षेत्रात जमिनीवर आणि खाली असलेले सर्व दहशतवादी तळ गाझाप्रमाणेच नष्ट करण्याचे आदेश दिले. इस्रायलच्या या आक्रमक पवित्र्यामुळे लेबनॉनमधील परिस्थिती पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे आहेत. इस्रायलने या भुयारांची तुलना गाझामध्ये हमासने वापरलेल्या बोगद्यांशी केली असून सीमेवरील सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही बांधकामाला थारा दिला जाणार नसल्याचे म्हटले. या कारवाईमुळे हिजबुल्लाच्या रणधुमाळीला मोठा धक्का बसला असून इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये (Lebanon) आपले नियंत्रण अधिक घट्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT