Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: ''हमासला संपवू शकणार नाही इस्रायल, आम्ही त्याला...''; शेजारील देशाची संतप्त प्रतिक्रिया

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचले आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचले आहे. यातच आता, पॅलेस्टिनी शहर गाझा पट्टीमध्ये इस्रायलकडून सुरु असलेल्या विनाशादरम्यान शेजारील देश जॉर्डनने मोठा इशारा दिला आहे. जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हमासला संपवण्याच्या इस्रायलच्या हेतूंवर शंका व्यक्त केली.

गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बफेक करुन आणि आक्रमण करुन हमासचा नाश करण्याचे उद्दिष्ट इस्रायल गाठू शकेल, अशी शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत.

परंतु आयमान सफादी यांनी बहरीनमधील वार्षिक आयआयएसएस मनामा डॉयलॉग ऑन सिक्युरिटी समिटमध्ये सांगितले की, "इस्रायल म्हणतो की त्याला हमासचा नायनाट करायचा आहे. येथे खूप लष्करी लोक आहेत, मला समजत नाही की ते उद्दिष्ट कसे साध्य करता येईल."

दरम्यान, अयमान सफादी यांनी इस्रायलला (Israel) इशारा दिला. ते म्हणाले की, अशा प्रकारचे विस्थापन रोखण्यासाठी त्यांचा देश "जे काही लागेल ते" करेल. ते पुढे म्हणाले की, “आम्ही हे कधीही होऊ देणार नाही. हा एक युद्ध गुन्हा आहे तसेच आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला थेट धोका आहे. हे थांबवण्यासाठी आम्ही जे काही लागेल ते करु.

आम्ही तुम्हाला सांगतो की, जॉर्डनची सीमा वेस्ट बँकला लागून आहे.'' दुसरीकडे, युद्धामुळे जॉर्डनमध्ये उलथापालथ होण्याची भीती निर्माण झाली असून अधिकाऱ्यांना वेस्ट बँकमधून पॅलेस्टिनींना मोठ्या प्रमाणावर बाहेर काढण्याचा धोका दिसायला लागला आहे.

आयमन सफादी पुढे म्हणाले की, "हे युद्ध आपल्याला अधिक संघर्ष, अधिक दुःख आणि क्षेत्रीय युद्धाच्या धोक्याकडे नेत आहे." इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर इस्रायलने हमासला (Hamas) नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. पण यामुळे हमासचा पराभव झाला तर गाझा या दाट लोकवस्तीवर कोणाची सत्ता राहील असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2007 पासून गाझा पट्टीवर हमासची सत्ता आहे.

ईयूचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल म्हणाले की, ''इस्रायल-हमास युद्ध संपल्यानंतर केवळ पॅलेस्टिनी प्राधिकरण (पीए) गाझा चालवू शकते. पाश्‍चात्त्य देशांच्‍या पाठिंब्याने पॅलेस्‍टीनी अथॉरिटी, वेस्‍ट बॅंकमध्‍ये मर्यादित स्‍वशासनाचा वापर करते. "हमास यापुढे गाझा नियंत्रित करु शकणार नाही. मग गाझावर नियंत्रण कोणाचे असणार? मला वाटते की ते फक्त एकच करु शकते - पॅलेस्टिनी प्राधिकरण.''

पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास म्हणाले की, जर पूर्ण राजकीय तोडगा निघाला तर गाझाच्या कारभारात पीए भूमिका बजावू शकेल. इस्रायल-पॅलेस्टिनी शांतता चर्चा 2014 पासून रखडली आहे.

दुसरीकडे मात्र, पॅलेस्टिनी लोकांमध्ये PA फारशी लोकप्रिय नाही. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे मध्यपूर्वेतील सल्लागार म्हणाले की, हमासने ओलिस ठेवलेल्यांची सुटका केल्याने मानवतावादी मदत वितरणात वाढ होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT