Israel Attacks Iran Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Iran War: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलचा इराणवर जोरदार हवाई हल्ला! 6 लष्करी तळ केले उद्ध्वस्त

Israel Iran airstrikes: अमेरिकेने रविवारी इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर सोमवारी इस्रायलने इराणच्या सहा लष्करी हवाई तळांवर हवाई हल्ले चढवले.

Sameer Amunekar

Israel strikes 6 Iranian military airport

अमेरिकेने रविवारी इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर सोमवारी इस्रायलने इराणच्या सहा लष्करी हवाई तळांवर हवाई हल्ले चढवले. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्करी क्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचे वृत्त आहे. इस्रायली हवाई दलाने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) या कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे.

इस्रायली हवाई दलाच्या (IAF) म्हणण्यानुसार, हे हवाई तळ पश्चिम, पूर्व आणि मध्य इराणमध्ये असून, यामध्ये केरमानशाह, हमेदान आणि तेहरान परिसरातील प्रमुख लष्करी तळांचा समावेश होता. या हल्ल्यांमध्ये धावपट्ट्या, भूमिगत बंकर, इंधन वाहक विमानं, तसेच F-14, F-5 आणि AH-1 प्रकारची लढाऊ विमाने उद्ध्वस्त झाली आहेत.

IAF ने दिलेल्या माहितीनुसार, "हवाई श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी आणि आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. आम्ही इराणी राजवटीच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे, साठवणूक सुविधा, रडार यंत्रणा आणि उपग्रह संप्रेषण केंद्रांनाही लक्ष्य केले."

या कारवाईत IAF च्या सुमारे 20 लढाऊ विमानांनी सहभागी होत इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांवर अचूक हल्ले केले.

दरम्यान, इस्रायली लष्कराने देखील एका कारवाईदरम्यान त्यांचा एक ड्रोन पाडल्याची पुष्टी केली आहे. याची माहिती Associated Press या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिली आहे.

या हल्ल्याच्या एक दिवस आधी अमेरिकेने फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान येथील इराणच्या प्रमुख अणुउद्योग केंद्रांवर हवाई कारवाई केली होती. Reutersने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सनी फोर्डो येथील केंद्रावर सहा बंकर भेदक बॉम्ब टाकले, तर उर्वरित दोन केंद्रांवर टोमाहॉक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला.

विशेष म्हणजे, 1979 मधील इराणी इस्लामिक क्रांतीनंतर प्रथमच अमेरिकेने इराणच्या अणुउद्योग केंद्रांवर थेट हल्ला केला आहे.

या पार्श्वभूमीवर, इस्रायलकडून 13 जूनपासून 'ऑपरेशन रायझिंग लायन' अंतर्गत इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर लक्ष्यित हल्ले करण्यात येत आहेत. या कारवाईच्या प्रत्युत्तरात इराणनेही इस्रायलच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र प्रहार केल्याची नोंद आहे.

हल्ल्याचा संभाव्य परिणाम

स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, इस्रायली हवाई कारवाईत सुमारे 800 हून अधिक इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या आकडेवारीची अधिकृत स्वतंत्र पडताळणी अद्याप झालेली नाही.

या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Independence Day 2025: आपल्या हाती जे ‘स्व-निर्णयाचं बळ’ आहे, त्याची ताकद स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरतरी प्रत्येकाच्या लक्षात येऊ दे

PM Modi Speech: टॅक्सचं ओझं कमी होणार, तरुणांसाठी रोजगार योजना; PM मोदींच्या लाल किल्ल्यावरुन दोन मोठ्या घोषणा

Chorao Ferryboat: महिनाभरापूर्वी बुडालेली फेरीबोट झाली दुरुस्त, ‘बेती’ पुन्हा सेवेत दाखल

Goa Today Live News: गोव्याला १४ वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाले पण...

Cutbona Jetty: 1655 खलाशांची तपासणी, कॉलराची 13 प्रकरणे; कुटबण जेटीवर उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

SCROLL FOR NEXT