Hamas Military Chief Muhammad Odeh Killed Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Gaza Surgical Strike: हमासचा नवा लष्कर प्रमुख ठार! इस्रायलची मोठी कारवाई; 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा 'मास्टरमाइंड' अखेर ढेर VIDEO

Hamas Military Chief Muhammad Odeh Killed: इस्रायली लष्कराने गाझात मोठी कारवाई करत हमासचा नवा लष्करी प्रमुख मुहम्मद ओदेह याला कंठस्नान घातल्याचा दावा केला.

Manish Jadhav

Hamas Military Chief Muhammad Odeh Killed: मिडल ईस्टमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धादरम्यान इस्रायली लष्कराने गाझात मोठी कारवाई करत हमासचा नवा लष्करी प्रमुख मुहम्मद ओदेह याला कंठस्नान घातल्याचा दावा केला. इस्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, ओदेह हा 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या भीषण आणि ऐतिहासिक दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक होता.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांच्या थेट आदेशानंतर ही अत्यंत गुप्त आणि वेगाने लष्करी कारवाई करण्यात आली. या मोठ्या यशाची अधिकृत पुष्टी इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने 'X' वर पोस्ट करत केली. इस्रायलच्या दाव्यानुसार, 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या वेळी मुहम्मद ओदेह हा हमासच्या गुप्तहेर विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत होता आणि त्याने हल्ल्याचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात मोठी भूमिका बजावली होती.

विशेष म्हणजे, अवघ्या एका आठवड्यापूर्वीच मुहम्मद ओदेहकडे हमासच्या लष्करी विंगच्या प्रमुखपदाची धुरा सोपवण्यात आली होती. याआधीचा प्रमुख इज्ज अल-दीन अल-हद्दाद हा दोन आठवड्यांपूर्वी गाझामध्ये झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात मारला गेल्यानंतर ओदेहची या पदावर नियुक्ती झाली होती. परंतु, हमासचे नेतृत्व हाती घेताच इस्रायलने त्यालाही ठार मारले. ओदेह हा अनेक इस्रायली नागरिकांची आणि सैनिकांची हत्या, अपहरण आणि प्राणघातक हल्ल्यांमध्ये थेट सामील होता. या कारवाईनंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी 'X' वर लिहिले की, 'आम्ही हमासच्या लष्करी विंगचा प्रमुख मुहम्मद ओदेह याला यशस्वीरित्या लक्ष्य केले असून तो मारला गेला. 7 ऑक्टोबरच्या क्रूर हल्ल्यात सामील असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना संपवू.'

गाझामधील या मोठ्या कारवाईसोबतच इस्रायलने (Israel) आता आपला मोर्चा शेजारील देश लेबनॉनकडेही वळवला असून दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ले अत्यंत तीव्र केले आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या रिपोर्टनुसार, टायर आणि मरजायून जिल्ह्यांमधील बुर्ज रहाल, सरीफा, अस-सवाना आणि काबरिखा यांसारख्या अनेक भागांना इस्रायली लढाऊ विमानांनी लक्ष्य केले. मंगळवारी दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या या भीषण हवाई हल्ल्यांमध्ये 31 लोकांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. हे हल्ले अशा वेळी वाढवण्यात आले, जेव्हा पंतप्रधान नेतन्याहू यांनी रविवारीच आपल्या सैन्याला हिजबुल्लाहविरुद्ध आणखी आक्रमकपणे मोहीम राबवण्याचे आदेश दिले.

नेतन्याहू यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे जाहीर केले की, इस्रायली सैन्य हिजबुल्लाहविरुद्ध पूर्ण ताकदीने लढत असून गेल्या काही आठवड्यांत त्यांच्या शूर सैनिकांनी 600 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, हा लढा येथेच थांबणार नसून लष्कराला अधिक आक्रमक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेकडूनही इस्रायलला हिजबुल्लाहविरुद्ध मोठ्या लष्करी मोहिमेसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचे संकेत आहेत. नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर इस्रायलने आपले हे ऑपरेशन अधिक वेगवान केले, ज्यामुळे या संपूर्ण क्षेत्रात कमालीचा तणाव निर्माण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT