TikTok & Instagram Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: 'मुलांच्या फोनमधून TikTok, Instagram अनइंस्टॉल करा', ज्यूइश शाळांकडून पालकांना आवाहन

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 2300 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे, ज्यामध्ये इस्रायलमधील 1200 आणि गाझामधील 1000 हून अधिक लोकांचा समावेश आहे.

त्याचवेळी, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईनंतर गाझामध्ये हाहाकार माजला आहे. हमासविरुद्धच्या वाढत्या युद्धादरम्यान, इस्रायलमधील शाळा, तसेच ब्रिटन आणि अमेरिकामधील (America) इस्रायली पालकांना त्यांच्या मुलांचा सोशल मीडियाचा वापर मर्यादित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गाझावरील इस्रायली हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात हमास ओलिस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या हत्येचे फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करु शकते या चिंतेदरम्यान हे आवाहन करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर यापूर्वीच अनेक भयानक व्हिडिओ आणि फुटेज समोर आले आहेत, ज्यात दहशतवादी एका संगीत महोत्सवात नागरिकांवर हल्ले करुन त्यांचे अपहरण करताना दिसत आहेत.

आरोपांनुसार, दहशतवाद्यांनी काही ज्यू मुलांचाही शिरच्छेद केला, या कृत्याचा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही निषेध केला आहे.

दरम्यान, इस्रायलमधील (Israel) पालकांच्या संघटनेने अलीकडेच त्यांच्या सदस्यांना एक संदेश पाठवला आहे, ज्यात त्यांना त्यांच्या मुलांच्या फोनमधून TikTok सारखी अॅप्स काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही आमच्या मुलांना हे सर्व पाहू देऊ शकत नाही.'

अमेरिका आणि ब्रिटनमध्येही आवाहन केले

अमेरिका आणि ब्रिटनमधील काही ज्यू शाळाही पालकांना अशीच विनंती करत आहेत. "इतर ज्यू शाळांसह, आम्ही पालकांना त्यांच्या मुलांच्या फोनमधून Instagram, X आणि TikTok सारखे सोशल मीडिया अॅप्स अनइंस्टॉल करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत ," असे न्यू जर्सीच्या शाळेच्या प्रमुखाने ईमेलमध्ये लिहिले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'ग्राफिक आणि दिशाभूल करणारी माहिती मुक्तपणे प्रसारीत होत असल्याने आमच्या विद्यार्थ्यांमध्ये भीती वाढत आहे...

पालकांनी या प्लॅटफॉर्मच्या धोक्यांबद्दल त्यांच्या मुलांशी दररोज चर्चा केली पाहिजे. ते काय पहात आहेत हे एखदा विचारले पाहिजे. त्यांनी त्यांच्या फोनमधून सर्वाधिक अनफिल्टर अॅप्स काढून टाकले आहेत.'

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, या आठवड्यात सिडनीमधील ज्यू शाळांनी पालकांना त्यांच्या मुलांकडून सोशल मीडियाच्या वापराबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. संभाव्य क्रियांमध्ये TikTok आणि Instagram सारखी अॅप्स काढून टाकणे समाविष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Matiechem Feast 2024: व्होडेकरा व्होडेकरा...! मातीशी नाळ जोडलेला ‘मातयेचे फेस्त’

Mapusa Assault Case: म्हापसा प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 9 जणांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

Nana Patekar: आता गोव्यातही "नाम" फाऊंडेशनची मुहुर्तमेढ रोवणार; नाना पाटेकरांची घोषणा

Subhash Velingkar Case: वेलिंगकरांना अटक करण्यात सरकार अपयशी; समुदायामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न!!

Subhash Velingkar: वेलिंगकरांवर कोणती कारवाई होणार? जामिनावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT