António Manuel de Oliveira Guterres Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: 'मुलांचे कब्रस्तान बनले गाझा...' , संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली चिंता

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा बुधवार हा 33 वा दिवस आहे. दरम्यान, युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धाबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War Updates UN Secretary-General Antonio Guterres Says Gaza becoming a graveyard for children: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा बुधवार हा 33 वा दिवस आहे. दरम्यान, युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धाबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. तात्काळ युद्धविरामाची घोषणा करण्यात यावी. न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

UN चे 89 कर्मचारी मारले गेले

संयुक्त राष्ट्राचे (United Nations) सरचिटणीस म्हणाले की, 'इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक महिना झाला आहे. या युद्धात युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजी (UNRWA) चे 89 कर्मचारी मारले गेले आहेत. तर 26 जण जखमी झाले आहेत.

मी माझ्या सहकाऱ्यांच्या शोकात सामील होतो. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबीयांसोबत मी आहे. आम्हाला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. आमच्या सहकाऱ्यांची खूप आठवण येईल आणि ते विसरले जाणार नाहीत.'

युद्धविराम होणार नाही

दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या आधीच जाहीर केले आहे की, 'ओलिसांची सुटका होईपर्यंत युद्धविराम होणार नाही. आम्ही गाझापर्यंत इंधनही पोहोचू देणार नाही. आम्ही हमासला पूर्णरित्या संपवू. युद्धात गाझाला धोका नाही.' इस्रायलचे (Israel) संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सांगितले की, गाझातून इस्रायलच्या सुरक्षेसाठी कोणताही धोका निर्माण होणार नाही याचा बंदोबस्त आम्ही करत आहोत.

हमासने 7 ऑक्टोबर रोजी हल्ला केला

अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या हमासने 7 ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलवर 5 हजारांहून अधिक बॉम्ब फेकले. या हल्ल्यात 1400 लोक मारले गेले. हमासच्या दहशतवाद्यांनी 250 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले आहे. त्याचवेळी, आतापर्यंत 11 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT