Israel–Hamas war 2023 Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: इस्त्रायल विरोधात रणनीती तयार; हिजबुल्लाह, हमास, इस्लामिकची लेबनॉनमध्ये बैठक

तिन्ही गटांना इराणने आणले एकत्र

Akshay Nirmale

Israel Hamas War: लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्ला, पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद आणि हमास यांनी इस्रायलच्या विरोधात एकजूट केली आहे. तिन्ही संघटनांच्या नेत्यांची बेरूतमध्ये बैठक झाली.

यादरम्यान गाझा आणि वेस्ट बँकमध्ये इस्रायली हल्ले थांबवण्याबाबत चर्चा झाली. जेरुसलेम पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. इराणने या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता.

हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाह याने हमासचा कमांडर सालेह अल-अरौरी आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचा नेता झियाद अल-नखलाह यांची लेबनॉनमधील बेरूत येथे भेट घेतली.

इराणी मीडिया अल-मायादीनच्या म्हणण्यानुसार, या बैठकीमुळे तिन्ही संघटनांमध्ये वाढता समन्वय दिसून येतो. खरे तर तिन्ही संघटनांनी एकत्र येऊन इस्रायलविरुद्ध आघाडी उघडावी, अशी इराणची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. आता असेच काहीसे घडत आहे.

हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला. ८ ऑक्टोबर रोजी हिजबुल्लाहने लेबनॉनमधूनही इस्रायलवर रॉकेट डागले.

पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादनेही रॉकेट हल्ले केले. इस्रायलच्या दाव्यानुसार इस्लामिक जिहादचे एक रॉकेट गाझा येथील हॉस्पिटलवर पडले आणि त्यात सुमारे 500 लोक ठार झाले.

दरम्यान, हिजबुल्लाहने एका निवेदनात म्हटले आहे की,- तिन्ही संघटनांमध्ये समन्वय राखण्यावर सहमती झाली आहे. आम्ही कसे जिंकायचे यावरही चर्चा झाली.

इराण या गटाला ऍक्सेस ऑफ रेझिस्टन्स म्हणतो. हिजबुल्लाहच्या मते, ऍक्सेस ऑफ रेझिस्टन्सने इस्रायलचे क्रूर हल्ले थांबवण्याची योजना आखली आहे. आम्ही एकमेकांचा पाठपुरावा करत आहोत. संपूर्ण युद्ध परिस्थितीवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, इस्रायलवर हल्ला करण्यापूर्वी इराण आणि तिन्ही संघटनांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती.

अमेरिकन मीडिया वॉल स्ट्रीट जर्नलने हमास आणि हिजबुल्लाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा हवाला देत म्हटले आहे की, इराणच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी हमासला इस्रायलवरील हल्ल्याची योजना आखण्यात मदत केली होती.

त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी बेरूतमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी हल्ल्याला हिरवा कंदील दिला होता.

बैठकीदरम्यान इस्रायल-हमास युद्धात सहभागी असलेला हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह म्हणाला- हमासच्या हल्ल्याच्या एक दिवसानंतर 8 ऑक्टोबरपासून हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ला करत आहे. यामध्ये 40 जवान शहीद झाले.

इराणी मीडिया अल-मायादीनच्या माहितीनुसार या वक्तव्यामुळे हिजबुल्लाह युद्धात सहभागी असल्याचे स्पष्ट होते.

इराण या संघटनांना निधी पुरवतो. प्रशिक्षणासोबतच लढवय्यांनाही इराण पैसा पुरवतो. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर इराणमधील लोकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

SCROLL FOR NEXT