Israel Hamas War
Israel Hamas War  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas युद्धामुळे अमेरिकन शस्त्रास्त्र कंपन्या मालामाल; शेअर्स वधारल्याने कंपन्यांना लॉटरी

Akshay Nirmale

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक महिना पूर्ण होत आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध अजुनही थांबलेले नसताना इस्त्रायल-हमास युद्धामुळे जग चिंतेत पडले. तथापि, या युद्धामुळे काही जणांना मात्र अब्जावधी रूपयांचा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.

या युद्धात मोठ्या प्रमाणात जीव आणि वित्त हानी झाली आहे, होत आहे. परंतु या युद्धामुळे अमेरिकन संरक्षण कंपन्यांचे मात्र उखळ पांढरे झाले आहे. या कंपन्यांची नजर आता या युद्धामुळे वाढणाऱ्या त्यांच्या व्यवसायावर आहे.

एक महिन्यापूर्वी, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर पहिला हल्ला केला. त्यात 1400 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 240 नागरिकांना ओलिस बनवले गेले. यानंतर इस्रायलने गाझाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.

गाझाच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, युद्धात 9,500 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांनी प्राण गमावले आहेत, ज्यात 4,800 मुलांचा समावेश आहे. युद्ध अजूनही सुरू आहे आणि ते कधी थांबेल हे सांगणे फार कठीण आहे.

इस्त्रायल-हमास युद्धाला गंभीर वळण मिळून ते संपूर्ण आखाती देश आणि पश्चिम आशियाला वेठीस धरू शकते. गेल्या महिन्याभराच्या या युद्धाने सर्वाधिक फायदा अमेरिकेच्या संरक्षण कंपन्यांचा झाला आहे.

गेल्या एका महिन्यात या संरक्षण कंपन्यांच्या समभागात जोरदार वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हादेखील अशीच परिस्थिती दिसून आली.

लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रे, उपग्रह तयार करणारी लॉकहीड मार्टिन कॉर्प ही जगातील सर्वात मोठी संरक्षण कंपनी आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी रशियन युद्धापूर्वी या कंपनीचा शेअर 355 डॉलरवर ट्रेड करत होता जो आता 455 डॉलरवर ट्रेड करत आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर स्टॉक 15 टक्क्यांनी वाढला आहे. याचा अर्थ असा की दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत स्टॉक जवळपास 30 टक्क्यांनी वाढला. या समभागाने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा दिला.

संरक्षण कंपन्यांची चांदी

Northrop Grumman Corp ही संरक्षण क्षेत्रातील जगातील चौथ्या क्रमांकाची अमेरिकन कंपनी आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे नॉर्थरोप ग्रुमन कॉर्पचा स्टॉक 7 ऑक्टोबरपासून झपाट्याने वाढला. या शेअरमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली.

गेल्या पाच वर्षांत या समभागाने ६५ टक्के परतावा दिला आहे. जनरल डायनॅमिक्स कॉर्पचे शेअर्सही एका महिन्यात 10 टक्क्यांहून अधिक वाढले. 5 वर्षांत या स्टॉकमध्ये 32 टक्के वाढ झाली.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की 2022 मध्ये जगातील टॉप 100 संरक्षण कंपन्यांनी 592 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला.

2022 मध्ये जगाचे संरक्षण बजेट 2200 अब्ज डॉलर्स होते, जे 2023 मध्ये 3000 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल.

अलीकडच्या काळात युक्रेन, कतार, इस्रायल, इजिप्त, इराण, जॉर्डनसह अनेक देशांनी संरक्षण बजेट वाढवले. युक्रेन आणि रशिया युद्धानंतर अमेरिकन संरक्षण कंपन्यांची विक्री वाढली. जगातील सर्वोच्च संरक्षण कंपन्या अमेरिकन आहेत.

अमेरिका हा शस्त्रास्त्रांचा मोठा निर्यातदार देश आहे. शस्त्रास्त्र निर्यातीत रशिया दुसऱ्या तर फ्रान्स तिसऱ्या स्थानी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT