Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: चीनमध्ये इस्रायली डिप्लोमॅटवर प्राणघातक हल्ला, दहशतवादी हल्ल्याची भीती

Israel-Hamas War: चीनमध्ये शुक्रवारी इस्रायली राजनयिक अधिकाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War Knife Attack On Israeli Diplomat in China: चीनमध्ये शुक्रवारी इस्रायली राजनयिक अधिकाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचं सांगण्यात येत आहे.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी टाइम्स ऑफ इस्रायलला दिलेल्या माहितीत याची पुष्टी केली आहे. चीनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात इस्रायली अधिकाऱ्याला चाकूने भोसकल्याचे वृत्त आहे.

या राजनयिक अधिकाऱ्यावर सध्या बीजिंग येथील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, इस्त्रायल (Israel) आणि हमास यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनची राजधानी बीजिंगमध्ये ही घटना घडली आहे.

इस्त्रायल आणि हमासने शुक्रवारी म्हणजेच आज 'हेट डे'चे आवाहन केले आहे. यानंतर जगभरातील इस्रायल आणि ज्यूंना हाय अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हल्ल्यानंतर चीन आणि इस्रायलमधील तणाव वाढणार का?

इस्रायली राजनयिक अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि चीनमधील संबंधांमध्ये तणाव आणखी वाढू शकतो, असे बोलले जात आहे.

बीजिंगमधील इस्रायलच्या राजदूताने नुकत्याच झालेल्या हमास हल्ल्याची चीनने निंदा न केल्याबद्दल निराशा व्यक्त केली होती. सध्याच्या संघर्षावर चीनच्या भूमिकेबद्दल इस्रायली सरकार आपल्या चिंतेबद्दल बोलले आहे.

दुसरीकडे, इस्रायल आणि हमास (Hamas) यांच्यातील आठवडाभर चाललेल्या संघर्षात 1,200 हून अधिक इस्रायली आणि 1,530 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, तर हजारो जखमी झाले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत.

दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्रायल गाझा पट्टीवर जमीनीवरुन हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' परदेशी सुंदरींचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Goa Election 2027: 'मिशन गोवा'साठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार! राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत रणनीतीवर शिक्कामोर्तब; विजयाची हॅट्ट्रिकसाठी 'जनसंपर्क पॅटर्न'

"गोवा म्हणजे जणू माझं घरच!", ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज अष्टपैलू गोव्याच्या प्रेमात; जुन्या मित्रांच्या भेटीसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Betim: सफर गोव्याची! डोंगर आणि नदी यांच्यामधील दुवा; निसर्गसंपन्न 'बेती'

पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

SCROLL FOR NEXT