Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: गाझामध्ये इस्रायलचा हवाई हल्ला, हमासच्या कमांडरसह 500 लोक ठार!

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील 14 दिवसांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, इस्रायलने हमासवरील हल्ले तीव्र केले आहेत. एका मोठ्या हवाई हल्ल्यात हमासचा कमांडर जिहाद महसेन आणि त्याचे कुटुंबीय ठार झाले आहे.

खुद्द हमासनेच ही माहिती दिली आहे. या हवाई हल्ल्यात 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. जिहाद हा हमासच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सुरक्षा दलाचा प्रमुख होता. ज्याचा आता मृत्यू झाला आहे.

दरम्यान, इस्रायल (Israel) आणि हमास यांच्यात गेल्या 14 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. ज्यामध्ये सुमारे 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, गाझामध्ये सुरु असलेल्या संघर्षात आतापर्यंत 3785 लोक मारले गेले आहेत.

गाझा शहरातील अल-अहली अल-अरबी हॉस्पिटलवर झालेल्या हवाई हल्ल्याची जबाबदारी इस्रायलने अद्याप स्वीकारलेली नाही. इस्लामिक जिहादने हा हल्ला केल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

दुसरीकडे, इस्रायल डिफेन्स फोर्सच्या प्रवक्त्याने गाझा येथील हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार असल्याचे म्हटले आहे. गाझामध्ये दहशतवाद्यांकडून रॉकेट डागण्यात आले. हे सर्व IDF ऑपरेशनल सिस्टमद्वारे उघड झाले आहे.

दुसरीकडे, इस्लामिक जिहादचा प्रवक्ता दाऊद शेहाबने यास नकार दिला आहे. हे सर्व खोटे आणि बनाव असल्याचे तो म्हणाला. हे सर्व गुन्हे आणि नरसंहार लपवण्यासाठी बोलले जात आहे. हा नागरिकांविरुद्ध गुन्हा आहे.

गाझामध्ये अनेकदा संघर्ष झाला आहे

2021 मध्ये संघर्षादरम्यान गाझा येथून 4,360 रॉकेट डागण्यात आले होते. इस्रायलने हा दावा केला होता. ज्यासाठी इस्लामिक जिहाद, हमास आणि इतर दहशतवाद्यांना (Terrorists) जबाबदार धरण्यात आले होते.

इस्रायलच्या हल्ल्यात चर्चमध्ये राहणारे लोकही ठार किंवा जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. हे लोक गाझा पट्टीत राहत होते. या हल्ल्यात ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये अनेक लोक मारले गेल्याचा दावा गाझा मंत्रालयाने केला होता. जखमीही झाले होते. एका प्रार्थनास्थळाला लक्ष्य करुन हा हल्ला करण्यात आला होता.

1 दशलक्ष पॅलेस्टिनी विस्थापित झाले आहेत

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या हल्ल्यामुळे 1 दशलक्षाहून अधिक पॅलेस्टिनी विस्थापित झाले आहेत. त्याचवेळी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे वक्तव्य आले आहे.

ते म्हणाले की, गाझामध्ये मानवतावादी मदतीला परवानगी दिली जाईल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही मानवतावादी मदतीसाठी विनंती केली होती.

दुसरीकडे, या हल्ल्यानंतर 300 लोकांना हमासने ओलिस ठेवल्याचेही समोर आले आहे. 7 ऑक्टोबर रोजी हा हल्ला करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT