Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: गाझामधील संघर्ष थांबवण्यासाठी इस्रायल तयार, हमाससमोर ठेवली 'ही' अट

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलकडून पुढाकार घेण्यात आला आहे. इस्रायलने हमासला एक प्रस्ताव पाठवला असून त्यात दोन महिन्यांसाठी युद्ध थांबवण्याबाबत सांगितले आहे. या युद्धात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या इजिप्त आणि कतारच्या माध्यमातून हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. इस्रायलच्या संरक्षण विभागाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

इस्रायलने हमासला प्रस्ताव पाठवला

दरम्यान, या ठरावात गाझामध्ये बंदिस्त असलेल्या सर्व ओलिसांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे. गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या अनेक इस्रायलींची कुटुंबे सरकारवर दबाव आणत आहेत. सोमवारी वित्त समितीच्या बैठकीदरम्यान ओलिसांच्या नातेवाईकांनी संसदेत प्रवेश केला. ते संसदेत म्हणाले की, 'तिथे ओलीस ठेवलेले लोक मारले जात आहेत, अशा स्थितीत तुम्ही इथे बैठक घेऊ शकत नाही.'

इस्रायली नागरिकांनी सरकारचा निषेध केला

दुसरीकडे, रविवारी रात्री लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सुटकेची मागणी करत इस्रायल सरकारविरोधात निदर्शने केली. सोमवारी इस्रायलने गाझा पट्टीतील खान युनिसमध्ये जोरदार बॉम्बहल्ला केला. या बॉम्बहल्ल्यात 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटानंतर पॅलेस्टाईनच्या रेड क्रिसेंट सोसायटीने प्रसारमाध्यमांना सांगितले की, इस्रायलच्या या जमिनीवरील कारवाईमुळे त्यांचा खान युनूसशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

ते पुढे म्हणाले की, 'इस्रायली सैन्याने त्यांच्या रुग्णवाहिका केंद्रांनाही घेरले, त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेणे शक्य झाले नाही.' 7 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार त्यांनी सुमारे नऊ हजार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT