Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: हमासने इस्रायलसमोर टेकले गुडघे; युद्धबंदी करार वाढवण्यासाठी...

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान चार दिवसांची तात्पुरती युद्धबंदी लागू झाली आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान चार दिवसांची तात्पुरती युद्धबंदी लागू झाली आहे. या युद्धबंदीचे मुख्य कारण म्हणजे जर हमासने गाझा पट्टीतील इस्रायली ओलीसांची सुटका केली तर इस्रायल पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका करेल. तात्पुरत्या युद्धबंदीचा आज शेवटचा दिवस आहे. हमास आता इस्रायलसमोर गुडघे टेकताना दिसत आहे, मात्र इस्रायलने मोठी अट घातली आहे.

दरम्यान, इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध 50 दिवसांपासून सुरु आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार आणि बॉम्बफेक सुरु आहे. या युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असून तेवढेच लोक जखमी झाले आहेत. या युद्धात हमास आणि इस्रायलने एकमेकांचे नागरिक आणि कैद्यांना ओलीस ठेवले होते.

आता ओलीसांची सुटका करण्यासाठी दोघांमध्ये चार दिवसांची तात्पुरती युद्धबंदी लागू करण्यात आल होती. या कालावधीत दोन्ही बाजूंकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे सांगण्यात आले होते.

जाणून घ्या काय आहे हमासची इच्छा

वृत्तसंस्था एएफपीने घटनेशी संबंधित लोकांच्या हवाल्याने असे वृत्त आले आहे की, हमासने इस्रायली मध्यस्थांना कळवले आहे की युद्धबंदी दोन ते चार दिवसांसाठी वाढवली जात आहे. तात्पुरती युद्धबंदी करार पुढे गेल्यास सुमारे 20 ते 40 इस्रायली ओलीसांची सुटका होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. हमासने इस्रायलसमोर शरणागती पत्करल्याचे युद्धबंदी करार वाढवण्याच्या प्रस्तावावरुन दिसून येते.

जाणून घ्या काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

इस्रायली सरकारचे म्हणणे आहे की, हमासने दररोज किमान 10 इस्रायली कैद्यांची सुटका केल्यास युद्धबंदी करार वाढवण्यास तयार आहे. यावरुन एक दिवस हमासला (Hamas) युद्धबंदीच्या बदल्यात 10 इस्रायली नागरिकांची सुटका करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, युद्धबंदीची मुदत संपताच आमचे सैन्य गाझा पट्टीवर हल्ला करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT