Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: इस्रायलला मोठा झटका! गाझामधील हल्ल्यात 20 हून अधिक इस्रायली सैनिक ठार

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, हमाससोबत सुरु असलेल्या संघर्षात इस्रायलला मोठा झटका बसला आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, हमाससोबत सुरु असलेल्या संघर्षात इस्रायलला मोठा झटका बसला आहे. गाझामध्ये झालेल्या हल्ल्यात 20 हून अधिक इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हमासचा नाश होईपर्यंत आणि 100 हून अधिक ओलीसांची सुटका होईपर्यंत युद्ध सुरुच राहील, असे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी मृतांचा ताजा आकडा दिला आहे. हगारी म्हणाले की, सोमवारी सैनिक इमारत पाडण्यासाठी स्फोटके तयार करत होते. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी डागलेला रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड तोफेजवळ पडला आणि वेळेपूर्वीच त्याचा स्फोट झाला. यानंतर ही इमारत सैनिकांवर पडली.

दरम्यान, गाझामध्ये तीन महिन्यांतील सर्वात प्राणघातक हल्ल्यात 10 सैनिक ठार झाल्याची माहिती यापूर्वी इस्रायली लष्कराने दिली होती. दुसरीकडे, इस्त्रायलच्या चॅनल 13 ने मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या जास्त असल्याचे म्हटले आहे. तसेच, आगामी काळात आणखी नावांची घोषणा होऊ शकते.

संतप्त ओलिसांचे नातेवाईक

दुसरीकडे, गाझामध्ये हमासने ओलिस ठेवलेल्या डझनभर लोकांच्या कुटुंबीयांनी सोमवारी वित्त समितीच्या बैठकीत इस्रायली संसदेत पोहोचले. यावेळी संतप्त कुटुंबीय म्हणाले की, तुम्ही (खासदार) इथे बसू शकत नाही, जेव्हा ते (ओलिस) तिथे मरत आहेत.' याआधी रविवारी रात्री, नातेवाईकांनी जेरुसलेममध्ये तंबू ठोकून त्यांचा निषेध सुरु ठेवला आणि जोपर्यंत आणखी काही ओलीसांची सुटका करण्यासाठी सरकार करार करत नाही तोपर्यंत तिथेच राहण्याची शपथही त्यांनी घेतली.

गाझा संघर्षात 25 हजार नागरिकांचा मृत्यू झाला

दुसरीकडे, गाझामध्ये इस्रायलचे हल्ले आणि पॅलेस्टिनींचे इस्रायलवर रॉकेट हल्ले सोमवारीही सुरुच होते. दरम्यान, UN च्या मानवतावादी अहवालात असे म्हटले आहे की, 7 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरु झाल्यापासून एन्क्लेव्हमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा आरोग्य अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देऊन, संयुक्त राष्ट्र मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालया (OCHA) ने सांगितले की, इस्रायली हल्ल्यात 62,681 पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT