Among Indians caught up in the ongoing war against Hamas, an Indian man has decided to stay there.  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: 'मी देशासोबत', युद्धाच्या परिस्थितीत भारतीय नागरिकाचा इस्रायलमध्ये राहण्याचा निर्णय

Israel-Hamas War: इस्रायली हवाई दल आता लेबनॉनमधील लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला करत आहेत. दरम्यान, लेबनॉन सीमेवर इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) वर गोळीबार करण्यात आला, ज्याला आयडीएफनेही प्रत्युत्तर दिले.

Ashutosh Masgaunde

Among Indians caught up in the ongoing war against Hamas, an Indian man has decided to stay at Israel: हमासविरुद्ध (Israel Hamas War) सुरू असलेल्या युद्धात अडकलेल्या भारतीयांमध्ये १० वर्षांपासून इस्रायलमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ते इस्रायलच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

राजस्थानमधील पुष्कर येथील कालो बाबा यांनी आपले स्थान न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या देशाने त्यांना त्यांच्या वाईट काळात मदत केली होती. इथे त्याला कमाईचे साधन मिळाले आणि नाव कमावण्याची संधीही मिळाली. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत कर्मभूमीला सोडू शकत नाही असे ते म्हणाले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कालो बाबा म्हणाले, 'मी इथे राहतो. माझा इथे व्यवसाय आणि स्वतःचे घर आहे. सध्या युद्ध सुरू आहे हे पाहून भीती वाटते, परंतु इतर कुटुंबेही येथे राहत आहेत आणि त्यांच्यामध्ये मी सुरक्षित आहे.

इतरांसोबत मी शाकाहारी भारतीय जेवण बनवतो, जे आम्ही इस्रायली सैन्याला खाऊ घालतो.

मी गेल्या 10 वर्षांपासून येथे राहत आहे आणि येथेच मी माझे नाव कमावले आहे. इस्रायलच्या या कठीण काळात मी देशाच्या पाठीशी उभा आहे. इतर लोकांप्रमाणे मलाही शांतता हवी आहे.

यावेळी कालो बाबा यांनी आपले लोकेशन सांगण्यास नकार दिला कारण, इस्रायली सैन्याने तेथिल नागरिकांना आपले लोकेशन अनोळखी लोकांशी शेअर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

इस्रायली वायुसेनेने X या सोशल मीडिया साइटवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'हवाई दलाचे लढाऊ हेलिकॉप्टर आता लेबनॉनमधील लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला करत आहेत.

दरम्यान, लेबनॉन सीमेवर इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) वर गोळीबार करण्यात आला, ज्याला आयडीएफनेही प्रत्युत्तर दिले.

इस्त्रायली संरक्षण दलाने सांगितले की, लेबनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत नऊ रॉकेट डागण्यात आले. आयडीएफ एरियल डिफेन्स अॅरेने पाच रॉकेट रोखले.

इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले की, त्यांना उत्तरेकडील भागात युद्ध करण्यात रस नाही. एक व्हिडिओ जारी करताना ते म्हणाले, 'उत्तरेशी युद्ध करण्यात आम्हाला रस नाही. आम्हाला युद्ध परिस्थिती वाढवायची नाही.

गॅलंट पुढे म्हणाले, 'जर हिजबुल्लाने युद्धाचा मार्ग स्वीकारला तर त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. परंतु जर त्याने स्वत: ला थांबवले तर आपण परिस्थितीचा आदर करू आणि गोष्टी जसेच्या तसे सोडू.

हमासविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 1400 इस्रायली नागरिक आणि गाझा पट्टीतील सुमारे 2500 लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीत शेकडो इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT