Israel-Hamas Deal in Gaza Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas Deal: रमजानपूर्वी गाझावासीयांसाठी मिळणार आनंदाची बातमी? इस्रायल आणि हमास यांच्यात होणार मोठा करार

Manish Jadhav

Israel-Hamas Deal in Gaza: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले भीषण युद्ध संपायचं नाव घेत नाहीये. सैन्य मागे घेतल्याशिवाय हमास इस्रायलशी वाटाघाटी करण्यास तयार नसेल तर हमासच्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा होईपर्यंत युद्ध सुरुच राहणार असल्याचा पुनरुच्चार इस्रायलने केला आहे. हमास आणि इस्रायलच्या लढाईत गाझामधील लोक पिचत आहेत. गाझामधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गाझातील लोकांना अन्न आणि औषध यासारख्या जीवनावश्यक गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागत आहे. गाझामधील लोकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, गाझामधील लोकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि कतारच्या मध्यस्थीमुळे इस्रायल आणि हमास मोठ्या कराराच्या जवळ आले आहेत.

दरम्यान, आठवड्यांच्या वाटाघाटीनंतर, इस्रायली आणि पॅलेस्टिनी अधिकारी गाझामधील लोकांसाठी करारावर एकमत होण्यासाठी तयार आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी केली आहे. यासाठी कमला हॅरिस आज इस्रायलच्या मंत्र्याची भेट घेणार आहेत. रमजानपूर्वी इस्रायल आणि हमास यांच्यात मोठा युद्धविराम करार होऊ शकतो, जो किमान 6 आठवडे चालेल, अशी बातमी आहे. या करारात गाझामधील लोकांना मोठ्या प्रमाणात मदतीचा मुद्दा ठळकपणे ठेवण्यात आला आहे.

अमेरिकन मीडिया वॉशिंग्टन पोस्टने वृत्त दिले आहे की, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामामध्ये दोन प्रमुख अटी असू शकतात. पहिली, इस्रायली ओलीसांची सुटका आणि दुसरी, गाझामधील लोकांना जास्तीत जास्त मदत करणे. दोन्ही बाजूंनी सर्वसाधारण अटी मान्य केल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इस्रायल, हमास आणि त्यांचे मध्यस्थ रमजानचा पवित्र महिना 10 मार्चला सुरु होण्यापूर्वी करारावर स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न करतील.

कमला हॅरिस म्हणाल्या- किमान 6 आठवडे युद्धविराम

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती हॅरिस यांनी रविवारी सांगितले की, इस्रायल आणि हमास यांच्यातील करारामध्ये किमान सहा आठवड्यांसाठी त्वरित युद्धविराम समाविष्ट असेल, जो डिसेंबरमध्ये संपलेल्या एक आठवड्याच्या युद्धविरामानंतरचा सर्वात मोठा आहे. युद्धविरामामध्ये इस्रायल आणि हमास यांच्याकडून ओलीस ठेवलेल्यांची देवाणघेवाण समाविष्ट असेल. याशिवाय, गाझामधील लोकांना मदत वाटप करण्याची सुविधा देखील समाविष्ट आहे.

व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, युद्धविरामाच्या अटींमध्ये हमासने ओलिस ठेवलेल्यांना मुक्त करणे आणि गाझातील लोकांना अधिक मदत देणे समाविष्ट आहे.

दुसरीकडे, 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुरु झालेल्या इस्रायल-हमास युद्धाचा गाझा शहरावर सर्वात वाईट परिणाम झाला आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या जमिनीवर आणि हवाई हल्ल्यांनंतर गाझा शहर पूर्णपणे उद्धवस्त झाले. एकट्या गाझा शहरातून या युद्धात किमान 30 हजार लोक मारले गेले आहेत. ज्यात प्रामुख्याने महिला, लहान मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. गाझा शहरातील भीषण मानवतावादी संकटाबद्दल अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे. कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी अलीकडेच सांगितले की, इस्रायलने गाझामध्ये अधिक मदतीची परवानगी दिली पाहिजे.

युद्धविरामावर हमासच्या कोर्टात चेंडू

इस्रायल आणि हमास यांच्यातील संभाव्य युद्धविरामाची सर्व चर्चा हमासवर अवलंबून आहे. कारण हमासने अद्याप या युद्धविरामाला अधिकृतपणे सहमती दिलेली नाही. चर्चेची माहिती असलेल्या एका इस्रायली अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जोपर्यंत हमासकडून प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत इस्रायल इजिप्तला चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवणार नाही.

दुसरीकडे हमासचे म्हणणे आहे की, जोपर्यंत इस्रायली सैनिक गाझामध्ये निष्पाप लोकांची हत्या थांबवत नाहीत तोपर्यंत युद्धविरामावरील चर्चा पुढे नेणे शक्य नाही. हमासने अलीकडेच गाझा शहरातील पुरवठ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याबद्दल इस्रायलला दोष दिला. या घटनेत 104 जणांना आपला जीव गमवावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT