Israel–Hamas war  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas Conflict: इस्राइलच्या मिलिटरी अॅक्शनमुळे नागरिकांच्या मृत्यूचा अमेरिकेने केला निषेध

Israel-Hamas Conflict: इस्रायलच्या लष्करी कारवाईमुळे गाझामध्ये झालेल्या विनाशाविरोधात असंतोष वाढत असतानाच त्यांनी हे हे वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

Israel-Hamas Conflict: गेल्या काही दिवसांपासून इस्राइल-हमास संघर्षाने थैमान घातले आहे. या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत असून आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी यामध्ये आपला जीव गमावला आहे.

आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी इस्रायलच्या लष्करी कारवाईमुळे गाझामधील नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध केला आहे. गेल्या काही आठवड्यात अनेक पॅलेस्टिनी मारले गेले असून अनेकांचे नुकसान झाले आहे. इस्रायलच्या लष्करी कारवाईमुळे गाझामध्ये झालेल्या विनाशाविरोधात असंतोष वाढत असतानाच त्यांनी हे हे वक्तव्य केले आहे.

भारत-अमेरिका 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चेच्या शेवटी एका मीडिया ब्रीफिंगमध्ये ब्लिंकेन यांनी हे वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले, 'गेल्या काही आठवड्यात अनेक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना मिळणारी मदत वाढवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे वक्तव्यदेखील त्यांनी केले आहे.

आम्ही इस्राइलबरोबर चर्चा सुरुच ठेवत असून हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करावी यासाठीदेखील अमेरिका प्रयत्न करणार असल्याचे ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. दरम्यान, या लढ्यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला असून अनेक नागरिक बेपत्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT