Netanyahu Against Protest Dainik Gomantak
ग्लोबल

Netanyahu Against Protest: निवडणूक निकालानंतर इस्रायली निदर्शकांचा रस्त्यांवर तांडव, नेतन्याहूंच्या घराला घेराव; 'अरब-यहूदी' सरकारची होतेय मागणी VIDEO

Benjamin Netanyahu Resignation Protests Tel Aviv: नेतन्याहू यांच्या निवडणूक पोस्टर्सची तोडफोड करत आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला.

Manish Jadhav

Benjamin Netanyahu Resignation Protests Tel Aviv: इस्त्रायलमध्ये मतमोजणी पूर्ण होताच देशात मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला. येथील 120 सदस्यांच्या संसदेत सरकार स्थापनेसाठी 61 जागांच्या स्पष्ट बहुमताची गरज असते, मात्र कोणत्याही युतीला हा जादूई आकडा गाठता आलेला नाही. या त्रिशंकू परिस्थितीमुळे संतापलेले हजारो लोक गुरुवारी थेट रस्त्यावर उतरले. जमावाने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.

तसेच, गाजा युद्ध ताबडतोब थांबवण्याच्या घोषणा देत आंदोलकांनी मुख्य रस्ते जाम केले. यादरम्यान नेतन्याहू यांच्या निवडणूक (Election) पोस्टर्सची तोडफोड करत आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. आंदोलक केवळ नेतन्याहू यांना सत्तेतून बेदखल करण्याची मागणी करत नसून, विरोधी पक्षांवरही अरब-नेतृत्वाखालील पक्षांना सोबत घेऊन संयुक्त अरब-यहूदी सरकार स्थापन करण्यासाठी मोठा दबाव टाकत आहेत.

मुख्य विरोधी आघाडीचे नेते आणि माजी लष्करप्रमुख गादी आइजनकोट यांच्या घराबाहेरही शेकडो नागरिकांनी धरणे आंदोलन केले. 'केवळ एकत्र येऊनच आपण जिंकू शकतो' असे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. तेल अवीव-जाफाचे उपमहापौर अमीर बद्रन यांनीही या आंदोलनात सहभाग घेत विरोधी पक्षांना अरब पक्षांसोबत हातमिळवणी करण्याचे आवाहन केले. दक्षिणपंथी नेते इतामार बेन-ग्वीर यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

निवडणुकीच्या 100 टक्के मतमोजणीनंतर समीकरणे अत्यंत गुंतागुंतीची झाली आहेत. नेतन्याहू यांच्या दक्षिणपंथी ब्लॉकला 53 जागा मिळाल्या असून, विरोधी ब्लॉकला 48 जागांवर समाधान मानवे लागले. मात्र, तब्बल 19 जागांवर विजय मिळवणारे अरब पक्ष या निवडणुकीत 'किंगमेकर' ठरले. नेतन्याहू यांना सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांना या 19 अरब खासदारांच्या समर्थनाची नितांत गरज आहे, परंतु यामुळे आपला पारंपरिक मतदार दुरावेल या भीतीमुळे विरोधी नेते संभ्रमात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Market Fire: दिवाळीच्या तोंडावर स्वप्नांची राखरांगोळी! वास्कोतील आगीत 150 विक्रेत्यांचे संसार उद्ध्वस्त

Shadashtak Yog 2026: गुरु-शनीची युती ठरणार घातक! 31 ऑक्टोबरला बनतोय अशुभ 'षडाष्टक योग'; 3 राशींच्या अडचणीत होणार वाढ

VIDEO: 'रायन रिकेल्टन, तुझी आई सिंगल आहे का?' चाहत्याच्या पोस्टरने वेधलं लक्ष; क्रिकेटपटूची रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा व्हिडिओ

Contractual Employees PF Benefits: कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पीएफचा लाभ; 3,800 जणांची नोंदणी, सरकारकडून अंमलबजावणी सुरू

Kadamba Plateau Casting Yard Case: कदंब पठारावरील कास्टिंग यार्डचे भवितव्य न्यायालयाच्या हाती; निकाल राखीव

SCROLL FOR NEXT