Israel drops bombs on Gaza Strip Dainik Gomantak
ग्लोबल

हमासच्या फायर बॉलला प्रत्यूत्तर देताना इस्त्रायलने गाझा पट्टीवर डागले बॉम्ब

दैनिक गोमन्तक

इस्त्रायलच्या (Israel) हवाई दलाने रविवारी गाझामधील (Gaza) हमासच्या (Hamas) तळांवर हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हमासने इस्रायलमध्ये फायरबॉल्सने (Fireball) भरलेले बलून सोडल्यानंतर ही घटना घडली आहे. इस्रायली सैनिकांसह गाझाच्या स्थानिक लोकांमध्येही हिंसेच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. लढाऊ विमानांनी हमासच्या लष्करी हल्ला केला असल्याची माहिती इस्त्रायलकडून देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी शस्त्रे बनवली जात होती आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते असे ठिकाणं यावेळी लक्ष्य करण्यात आले आहे.

जबलियाजवळच्या गुप्तचर बोगद्यावरही इस्त्रायलकडून बॉम्ब टाकण्यात आले आहेत. हमासने फायरबॉल्सने भरलेले फुगे सोडल्याच्या घटनेनांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. इस्रायली लष्कराने सांगितले की, हमास सातत्याने दहशतवादी कारवाया करत आहेत आणि नागरिकांना लक्ष्य करत आहेत हे या दोन्ही घटनांमधून दिसून येते. मात्र, इस्रायली बॉम्बहल्ल्यात गाझा पट्टीत कोणाचाही मृत्यू झाल्याची बातमी अद्याप आलेली नाही. इस्रायलचे पंतप्रधान नेफ्टाली बेनेट यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, गाझाच्या इस्लामिक कट्टरवाद्यांनी शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

यापूर्वी शेकडो हमास समर्थकांनी इस्रायलच्या सीमेवर निदर्शने केली. हमास समर्थकांनी सांगितले की, गाझा पट्टीवर लादलेले आर्थिक निर्बंध कमी करण्यासाठी इस्रायलवर दबाव वाढवण्याच्या उद्देशाने निदर्शनं करण्यात आली. 2007 मध्ये हमासने गाझा पट्टीचा ताबा घेतल्यापासून इस्रायल आणि इजिप्तने त्यावर बंदी घातली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT