Israel Defence Forces Killed Hamas Air Force Chief Ali Qadhi: इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. सर्वप्रथम हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. यानंतर इस्रायलने हमासला चोख प्रत्युत्तर दिले.
हमासची पाळेमुळे गाझामधून उखडून टाकण्याची खूनगाठ इस्रायलने बांधली आहे. दरम्यान, हमासचा हवाई दल प्रमुख अली कादी शनिवारी ठार झाला. आता इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने देखील मीडिया रिपोर्ट्सला मान्यता दिली आहे.
अली कादीला ठार मारल्यानंतर, IDF ने ट्विट केले की, “अली कादीने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये नागरिकांच्या अमानुष, रानटी हत्याकांडाचे नेतृत्व केले. आम्ही त्याला मारले. हीच गत हमासच्या दहशतवाद्यांची होणार.”
यासोबतच हमासचा लष्करी कमांडर अबू मुराद याचाही मृत्यू झाल्याची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली संरक्षण दलाने गाझा पट्टीमध्ये रात्रभर हवाई हल्ले केले. याच हवाई हल्ल्यात हमासच्या (Hamas) हवाई ताफ्याचा प्रमुखही मारला गेला.
या हल्ल्यात हमासच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले. गेल्या आठवड्यात झालेल्या हत्याकांडात दहशतवाद्यांना मार्गदर्शन करण्यात अबू मुरादची मोठी भूमिका होती. इस्रायलमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचाही यात समावेश होता.
दुसरीकडे, हमासच्या हल्ल्याशी संबंधित काही गुप्त कागदपत्रे समोर आली आहेत. अहवालानुसार, शक्य तितक्या लोकांना मारण्यासाठी हमासने इस्रायलमधील प्राथमिक शाळा आणि युवा केंद्रांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. तसेच ओलिसांना पकडून गाझा पट्टीत नेले जाऊ शकते.
एनबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेनुसार ज्या गावांमध्ये सर्वाधिक नागरिक जमतात त्या गावांवर हल्ला करण्याची योजना होती. इस्रायली अधिकाऱ्यांनी अद्याप Kfar Saad मध्ये मृतांची संख्या निश्चित केलेली नाही, NBC न्यूजच्या वृत्तानुसार.
इस्रायली संरक्षण दलाने शनिवारी पुष्टी केली की, हमास या दहशतवादी (Terrorist) संघटनेने गाझामधील 120 हून अधिक नागरिकांना ताब्यात घेतले आहे. गाझामधील सुमारे 11 लाख लोकांना लवकरात लवकर गाझा सोडून जाण्याच्या सूचनाही इस्रायली सेनेने दिल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.