Israel PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak
ग्लोबल

Lashkar-e-Taiba: इस्रायलचा पाकिस्तानला मोठा झटका, लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून केले घोषित!

Israel Declared Lashkar-e-Taiba A Terrorist Organization: हमाससोबत युद्धात अडकलेल्या इस्रायलने मोठे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानला मोठा झटका देत इस्रायलने लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

Manish Jadhav

Israel Declared Lashkar-e-Taiba A Terrorist Organization: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, हमाससोबत युद्धात अडकलेल्या इस्रायलने मोठे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानला मोठा झटका देत इस्रायलने लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

भारतातील इस्रायली दूतावासाने ही माहिती दिली. 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पूर्ण होत असताना इस्रायलने हे पाऊल उचलले आहे.

यापूर्वी, हमाससोबतच्या युद्धादरम्यान इस्रायलने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी भारताकडे केली होती. इस्रायलचे हे पाऊल भारताने हमासलाही दहशतवादी संघटना घोषित करण्याचा मोठा संदेश दिला असल्याचे मानले जात आहे. दहशतवादाबाबत भारताच्या भूमिकेला हे समर्थन असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भारताने (India) अद्याप हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले नाही. सध्या अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियनसह अनेक देश हमासला दहशतवादी संघटना मानतात. आता इस्रायलने स्पष्टपणे म्हटले आहे की, भारतीयांच्या हत्येला लष्कर-ए-तैयबा जबाबदार आहे आणि म्हणूनच ते त्याला दहशतवादी संघटना मानते. इस्रायलने अद्याप जैश-ए-मोहम्मदला दहशतवादी संघटना मानलेले नाही.

इस्रायली दूतावास काय म्हणाले?

मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त इस्रायलने लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केले आहे, असे भारतातील इस्रायलच्या दूतावासाने म्हटले आहे.

भारत सरकारने विनंती केली नसतानाही, इस्रायल सरकारने औपचारिकपणे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या इस्रायली यादीत लष्कर-ए-तैयबाचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक तपास केला आहे. नियमांची पूर्तता केली आहे.

मुंबई हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता

दुसरीकडे, 26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता, ज्यामध्ये 166 लोक मारले गेले होते आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. यादरम्यान 9 दहशतवादी मारले गेले होते. विशेष म्हणजे, अजमल कसाब नावाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते, त्याला नंतर फाशी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 Sutak Time: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबरला; जाणून घ्या ग्रहण आणि सूतक काळाची वेळ व नियम

Maratha Reservation: सरकार एक तासांत GR काढणार; जरांगेच्या उपोषणाला मोठे यश! हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार

Horoscope Chanda Grahan: मेष, वृषभ , कन्या राशींसाठी 'चंद्र ग्रहण' लाभदायी; आर्थिक स्थैर्य लाभणार, 'या' राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी

Rashid Khan: करामती राशिदचा मोठा 'कारनामा'! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा आशियाई कर्णधार; नेतृत्वासह गोलंदाजीतही चमकला

Landslide: 'या' देशात पावसाचा हाहाकार! भूस्खलनात संपूर्ण गाव जमीनदोस्त; 1000 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT