Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: ख्रिसमसच्या दिवशी गाझामध्ये 70 हून अधिक जणांचा मृत्यू, इस्रायली हल्ले सुरुच!

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात 80 दिवसांहून अधिक काळ युद्ध सुरु आहे. इस्रायलने ख्रिसमसच्या दिवशी गाझामध्ये प्रचंड विध्वंस केला.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात 80 दिवसांहून अधिक काळ युद्ध सुरु आहे. इस्रायलने ख्रिसमसच्या दिवशी गाझामध्ये प्रचंड विध्वंस केला. वृत्तानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात 70 हून अधिक लोक मारले गेले आहेत. हा अतिशय प्राणघातक हवाई हल्ला होता, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने रविवारी रात्रीपासूनच हल्ले सुरु केले होते. सकाळपर्यंत हल्ले सुरुच होते. हल्ल्यानंतर परिस्थिती अशी होती की, लोक नातेवाईकांचे मृतदेह घेऊन पळत होते. या हल्ल्यामुळे, येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान असलेल्या बेथलेहेम या वेस्ट बँक शहरातील ख्रिसमसचे उत्सवही रद्द करण्यात आले. इस्रायलच्या हल्ल्यामुळे ख्रिसमसच्या निमित्ताने गाझामध्ये शांतता होती. मिळालेल्या माहितीनुसार, गाझा येथील जबलिया येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना जीव गमवावा लागला.

दरम्यान, येशूचे जन्मस्थान असलेले शहर हादरले. लोकांनी ख्रिसमसचा उत्सव देखील साजरा केला नाही. इथे असलेल्या चर्चनेही गाझाशी सॉलिडेरिटी दर्शवली. त्यामुळेच त्यांनी नाताळ सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी, इस्रायलने गाझामधील हल्ले आणखी वाढवले आहेत. इस्रायलने निर्वासितांच्या छावण्यांना लक्ष्य केले. यानंतर अनेक घरांचीही पडझड झाली. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात मृतांचा आकडा 20 हजारांच्या पुढे गेला आहे.

दुसरीकडे, हमासचे दहशतवादी गाझामधील दाट लोकवस्तीच्या भागात लपले असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनीही हमासचा पूर्णपणे नायनाट करण्याची शपथ घेतली. अनेक देशांनी इस्रायलला निरपराधांची हत्या करु नये असे आवाहन केले आहे. जरी इस्रायल गाझावर सतत बॉम्बहल्ला करत आहे. इस्रायल हवाई तसेच जमिनीवरुन हल्ले करत आहे. याशिवाय, मुख्य रस्ते आणि रुग्णालयेही उद्ध्वस्त झाली आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने बेथलेहेममधील उत्सवही रद्द करण्यात आले. इथे दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताचा जन्म दोन हजार वर्षांपूर्वी इथे झाला होता. आता 100 हून अधिक इस्रायली ओलीस हमासच्या ताब्यात आहेत. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये पलटवार सुरु केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT