Ali Larijani Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

Iran Security Chief Killed Claim: इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी मंगळवारी (17 मार्च) इराणच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारिजानी यांचा खात्मा केल्याचा खळबळजनक दावा केला.

Manish Jadhav

Ali Larijani Death News: इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचला असून इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी मंगळवारी (17 मार्च) इराणच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारिजानी यांचा खात्मा केल्याचा खळबळजनक दावा केला.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने सोमवारी रात्री इराणच्या विविध भागांत केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांमध्ये लारिजानी आणि 'बासिज' दलाचे कमांडर गुलामरेझा सुलेमानी यांना ठार केल्याचे म्हटले. या हल्ल्यानंतर बोलताना इस्रायल कात्झ यांनी अत्यंत कठोर शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. "लारिजानी आणि बासिज कमांडर काल रात्रीच्या कारवाईत मारले गेले. ज्याप्रमाणे यापूर्वी खामेनी आणि 'ॲक्सिस ऑफ इव्हिल'चे इतर सदस्य यांचा खात्मा करण्यात आला, त्याचप्रमाणे या दोघांनाही ठार मारले," असे कात्झ यांनी त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले.

दरम्यान, या मोठ्या दाव्यानंतरही इराणची (Iran) राजधानी तेहरानमधून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. दुसरीकडे मात्र, ज्यावेळी इस्रायलकडून लारिजानी यांच्या मृत्यूचा दावा केला जात होता, त्याच दरम्यान लारिजानी यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली. या पोस्टमध्ये इराणच्या नौदलातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

"शहीद जवानांचे स्मरण इराणी जनतेच्या हृदयात कायम राहील आणि त्यांच्या बलिदानामुळे इराणच्या लष्कराचा पाया अधिक मजबूत होईल," अशा अर्थाची ही पोस्ट आहे. यामुळे लारिजानी जिवंत आहेत की हे त्यांचे जुने शेड्युल केलेले ट्विट आहे, याबाबत गूढ निर्माण झाले आहे. इराणने लारिजानी यांच्या स्थितीबद्दल पूर्णपणे मौन पाळल्याने जागतिक स्तरावर संभ्रमाचे वातावरण आहे.

इस्रायली लष्कराच्या मते, सोमवारी रात्री इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये लारिजानी हे मुख्य लक्ष्यांपैकी एक होते. जर लारिजानी यांच्या मृत्यूच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला, तर हा इराणसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जाईल. 28 फेब्रुवारी रोजी युद्धाच्या पहिल्याच दिवशी सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर लारिजानी यांचा मृत्यू ही इराणसाठी दुसरी मोठी हानी ठरेल.

लारिजानी यांना नुकतेच शुक्रवारी तेहरानमधील 'कुड्स डे' रॅलीमध्ये पाहिले गेले होते. विशेष म्हणजे, त्याच दिवशी अमेरिकेने लारिजानी यांच्यासह इराणच्या 10 गुप्तचर आणि लष्करी अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यास 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. हे सर्व अधिकारी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

इस्रायलने (Israel) या कारवाईत केवळ लारिजानी यांनाच नव्हे, तर इराणच्या 'बासिज' दलाचे प्रमुख गुलामरेझा सुलेमानी यांनाही ठार केल्याचा दावा केला. बासिज हे इराणमधील एक निमलष्करी दल असून ते थेट रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या नियंत्रणाखाली काम करते. या महत्त्वाच्या लष्करी नेतृत्वाला संपवल्याचा दावा करुन इस्रायलने इराणच्या लष्करी शक्तीला मोठे आव्हान दिले आहे. या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराण यावर काय प्रत्युत्तर देतो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. एकीकडे इस्रायल 'नरकात पाठवले' अशी भाषा करत विजयाचा आनंद साजरा करत आहे, तर दुसरीकडे इराणच्या मौनामुळे लारिजानी यांच्या मृत्यूचे रहस्य अधिकच गडद होत चालले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT