Israel Airstrikes Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Airstrikes: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, 24 तासांत 250 हून अधिक लोकांचा मृत्यू; मानवतावादी संकट अधिक गडद

Israel Hamas War: इस्त्रायलने पुन्हा एकदा गाझावर हवाई हल्ल्यांचा मारा केला. शनिवारी (17 मे) रात्री आणि रविवारी (18 मे) गाझावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

इस्त्रायलने पुन्हा एकदा गाझावर हवाई हल्ल्यांचा मारा केला. शनिवारी (17 मे) रात्री आणि रविवारी (18 मे) गाझावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यापैकी रविवारी 103 जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात महिला आणि मुलांची संख्या मोठी आहे. स्थानिक रुग्णालये आणि वैद्यकीय सूत्रांनी ही माहिती दिली.

दरम्यान, दक्षिणेकडील खान युनूस शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात झालेल्या हल्ल्यांमध्ये 48 हून अधिक लोक मारले गेले. नासेर रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांच्या घरांवर आणि तंबूंवर अनेक हवाई हल्ले करण्यात आले. मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुले आहेत, ज्यामुळे हल्ल्यातील मानवी नुकसान आणखी गंभीर झाले.

जबालियामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांची हत्या

गाझाच्या (Gaza) आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले की, उत्तर गाझातील जबालिया निर्वासित छावणीतील एका घरावर झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. नागरी संरक्षण सेवेनुसार, जबालिया येथे झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात सात मुले आणि एका महिलेसह 10 जणांना जीव गमवावा लागला.

इस्रायली सैन्याची अद्याप प्रतिक्रिया आली नाही

दरम्यान, या हवाई हल्ल्यांबाबत इस्रायली लष्कराकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हे हल्ले अशा वेळी झाले जेव्हा इस्रायलने गाझामध्ये आपले लष्करी ऑपरेशन तीव्र केले. इस्त्रायलला (Israel) या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. दक्षिण गाझामधील लाखो पॅलेस्टिनींना विस्थापित करण्यासोबत मानवतावादी मदत वितरणावर नियंत्रण वाढवण्याची इस्त्रायलची योजना आहे.

इंडोनेशियन रुग्णालय बंद

इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर उत्तर गाझा युद्धक्षेत्रातील शेवटचे कार्यरत इंडोनेशियन सरकारी रुग्णालय आता बंद करण्यात आले आहे. रुग्णालयाभोवती मोठ्या प्रमाणात नाकेबंदी आणि सततच्या हल्ल्यांमुळे रुग्णालयाची सेवा स्थगित करावी लागली. यापूर्वी, कमाल अदवान रुग्णालय आणि बेत हानून रुग्णालयाची सेवा बंद करण्यास भाग पाडण्यात आले होते, ज्यामुळे उत्तर गाझातील नागरिकांना मूलभूत वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागले.

मानवतावादी संकट

इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे गाझामधील मानवीय संकट अधिक गंभीर होत चालले आहे. रुग्णालये बंद पडणे, विस्थापित नागरिकांवरील हल्ले आणि मुले आणि महिलांचे मृत्यू यामुळे हे स्पष्ट होते की युद्धाचा थेट परिणाम नागरिकांवर झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT