Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या, इस्लामाबाद पोलिस करणार अटक

इम्रान खान यांना जमान पार्क येथून अटक होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Imran Khan: भारताच्या शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाने एका महिला न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी त्यांना अजामीन पात्र वॉरंट जारी केले आहे. या

मुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर इम्रान खान यांना अटक करून 29 मार्च आधी न्यायालयात हजर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.

20 ऑगस्ट रोजी एफ-9 पार्कमधील एका रॅलीत न्यायदंडाधिकारी झेबा चौधरी आणि पोलिस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे.

दिवाणी न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी तीन पानांचा निकाल जाहीर करत तसेच या प्रकरणी इम्रान खान न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

माजी पंतप्रधानांनी सुनावणीला हजर राहण्याऐवजी न्यायाधीशांसमोर हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. तसेच व्हिडिओ कॉन्फरनसिंग द्वारे न्यायालयात उपस्थित राहण्या संदर्भात त्यांनी परवानगी मागितली होती. पण, न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळत त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिस एका विशेष हेलिकॉप्टरने त्याच्या लाहोर येथील निवासस्थानी पोहचले. मात्र, यावेळी पोलिसांना चुकवत खान हे आपल्या हजारोंच्या संख्येने असलेल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले होते.

इम्रान खान यांची गेल्या एप्रिलमध्ये पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. इस्लामाबाद आणि लाहोरच्या पोलीस अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत त्यांना अटक करण्याचे ठरले. खान यांना अटक करण्यासाठी पोलिस दुसऱ्यांदा लाहोरमध्ये आले आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT