ISIS using Tiktok app for recruit suicide bombers  Dainik Gomantak
ग्लोबल

सावधान! तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी ISIS करतंय 'TikTok' चा वापर

तरुणांमध्ये लोकप्रिय व्यासपीठ असलेल्या TikTok चा वापर ISIS गैर-मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

इस्लामिक स्टेट (ISIS) ही दहशतवादी संघटना ख्रिसमसच्या (Christmas) उत्सवादरम्यान हल्ले करण्यासाठी तरुण आत्मघाती हल्लेखोरांची भरती करण्यासाठी लहान-व्हिडिओ पोस्ट होणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TikTok चा वापर करत असल्याचे आढळून आले आहे.एका वृत्त पत्राच्या अहवालानुसार TikTok प्लॅटफॉर्मवर ISIS चा प्रचार करण्यासाठी तशा पोस्ट करणारी अनेक खाती तयार करण्यात आली आहेत.(ISIS using Tiktok app for recruit suicide bombers)

तरुणांमध्ये लोकप्रिय व्यासपीठ असलेल्या TikTok चा वापर ISIS गैर-मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी केला जात आहे.

या अहवालानुसार समोर आलेल्या व्हिडिओंपैकी एक व्हिडिओत लोकांना ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये पाश्चात्य देशांमध्ये दहशतवादी हल्ले करून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी करण्यास प्रोत्साहित केले आहे. व्हिडिओमध्ये ख्रिसमसचे वर्णन “कुफार आणि क्रुसेडर्सचा उत्सव” असे केले आहे. त्यात म्हटले आहे, “ते अल्लाहवर विश्वास ठेवत नाहीत आणि ते इस्लामिक पवित्राची थट्टा करतात.ते शैतानगुलाम आहेत.” व्हिडिओमध्ये ख्रिसमस मार्केट आणि सेलिब्रेशनची अनेक दृश्ये दर्शविण्यात आली होती आणि या व्हिडिओत पुढे , "हे अल्लाहच्या सैनिकांनो , या कुफारांचे रक्त सांडण्यासाठी स्वतःला तयार करा."असे आवाहन करण्यात आले आहे.

या व्हिडिओत निवेदकाने दर्शकांना आत्मघाती बॉम्बर बनण्यास आणि ख्रिसमस मध्ये जे कपडे वापरले जातात तसे कपडे परिधान करून जमावावर हल्ला करण्यास प्रोत्साहित केले आहे. त्याने दर्शकांना वेशात लपवून ठेवलेली स्फोटके आणण्यासाठी आणि "त्याचा स्फोट करून त्यांच्या अंतःकरणात दहशत निर्माण करण्यास" प्रोत्साहित केले आहे.

हा व्हिडिओ एका अकाऊंटवर अपलोड करण्यात आला होता ज्याचा वापर आयएसआयएसचा प्रचार करण्यासाठी केला जात होता. खाते गेल्या 18 महिन्यांपासून कार्यरत आहे आणि हजारो वेळा पाहिले गेले आहे. केवळ हे खातेच नाही तर इतर अनेकजण शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर असे करत असल्याचे आढळले असून दुसर्‍या खात्यात बुरखा घातलेल्या एका महिलेचा व्हिडिओ आहे जिने जर्मनीतील इमारती आणि संरचनेचा पाळत ठेवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “अल्लाह तुम्हाला स्वर्गात स्वीकारो”. खात्याच्या बायोमध्ये असे लिहिले आहे की, “सिंह आपल्या भक्षासाठी लढतो आणि त्याच्या शत्रूंना त्याच्या कळपात बदलतो”.

लिव्हरपूलमधील कार बॉम्ब हल्ल्यापासून यूकेला "तीव्र" दहशतवादी धोक्याचा सामना करावा लागत आहे. कोविड-19 साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन कालावधीत आणखी अनेक हल्लेखोर तयार झाले असण्याची शक्यता सुरक्षा एजन्सी सांगत आहेत . आणि आता निर्बंध उठवल्यांनंतर देशात हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, 17 नोव्हेंबर रोजी इटलीतील मिलान पोलिसांनी एका 19 वर्षीय महिलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. पोलिसांना शिरच्छेदाचे व्हिडिओ, ISIS च्या प्रचार शाखेने तयार केलेली सामग्री आणि ऑगस्टमध्ये काबूल विमानतळाबाहेर स्वत:ला उडवणाऱ्या तरुणाचा फोटो सापडला ज्यामध्ये 183 लोकांचा बळी गेला होता.

एप्रिल 2019 मध्ये, ISIS ने इस्टरच्या दिवशी श्रीलंकेत सीरियल बॉम्ब हल्ला केला. बेट राष्ट्राच्या 3 शहरांमध्ये 8 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी झालेल्या हल्ल्यांमध्ये शेकडो लोक मारले गेले आणि जखमी झाले होते आणि आता ISIS पुन्हा एकदा ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान हल्ले घडवण्याची तयारी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT