Is china preparing for war Xi Jinping announce for big army recruitment Dainik Gomantak
ग्लोबल

चीन करतोय युद्धाची तयारी,ड्रॅगन लष्करात मोठी भरती!

दैनिक गोमन्तक

चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी चिनी लष्कराच्या (China Army) झपाट्याने आधुनिकीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सशस्त्र दलांच्या जलद आधुनिकीकरणाला पाठिंबा देण्यासाठी आणि भविष्यातील युद्धे जिंकण्यासाठी नवीन लोकांची भरती करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.तत्पूर्वी चीनच्या सैन्याने फ्रंटलाइन पोस्टसाठी तीन लाख जवानांची भरती करण्यासाठी संसाधने दिली असल्याची माहिती समोर येताच चीनच्या राष्ट्रपतींचे हे विधान आले आहे. चिनी सशस्त्र दलांच्या विकासासाठी, युद्धे जिंकण्यासाठी आणि भविष्यातील युद्धांमध्ये नेतृत्व करण्यासाठी ही प्रतिभा महत्त्वाची असल्याचं चिनी सैन्याचे नेतृत्व करणारे शी जिनपिंग यांनी सांगितलं आहे. (Is china preparing for war Xi Jinping announce for big army recruitment)

209 अब्ज डॉलर्ससह, चीनचे संरक्षण बजेट सर्वात मोठे आहे. त्यातच अलिकडच्या दशकात चीनने आपल्या लष्कराचे वेगाने आधुनिकीकरण करण्याचा आग्रह धरला आहे त्यासाठी चीनने संघटनात्मक सुधारणा केल्या आणि सैन्यात हायपरसोनिक शस्त्रांसह नवीन शस्त्र प्रणाली जोडली आहे. अमेरिकन लष्कराच्या म्हणण्यानुसार, चीनने नुकतेच लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र सोडले, ज्याने संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घातली. ते हायपरसोनिक ग्लाइड वाहनापासून वेगळे झाले आणि चीनला परतले. या चाचणीदरम्यान हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आपले लक्ष्य नष्ट करण्याच्या अगदी जवळ आले होते.

शी जिनपिंग म्हणाले की, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ला 2027 मध्ये येणार्‍या शताब्दी वर्षासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ठोस सहाय्य प्रदान करण्यासाठी नवीन प्रतिभेची गरज आहे. अशी माहिती स्थानीक वृत्तपत्राने दिली आहे. चीनचे अध्यक्ष म्हणाले, "लढाई आणि जिंकण्याची क्षमता मजबूत करणे हे लष्करी प्रतिभेच्या नवीन पिढीचे प्रारंभिक बिंदू आणि अंतिम ध्येय असले पाहिजे." आणि यासाठी त्यांनी प्रयत्न वाढवण्याची विनंती देखील केली आहे .

दरम्यान चिनी सैन्याने तरुण व्यावसायिकांना पीएलएमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे. आघाडीच्या भूमिकेसाठी 3 लाख सैनिकांसाठी संसाधनांचे वाटप करण्यात आले आहे. 2012 मध्ये सत्ता हाती घेतल्यापासून, जिनपिंग यांनी सैन्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत, ज्यात PLA द्वारे सैन्याचा आकार 23 दशलक्ष वरून 20 लाखांवर कमी करणे समाविष्ट आहे. नॉन कॉम्बॅट युनिटमधून 3 लाख जवानांना काढून टाकण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT