IRGC Intelligence Chief Majid Khatami Dainik Gomantak
ग्लोबल

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

IRGC Intelligence Chief Majid Khatami Killed: इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) गुप्तचर प्रमुख मेजर जनरल माजिद खातमी यांचा आज (6 एप्रिल) पहाटे अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला.

Manish Jadhav

IRGC Intelligence Chief Majid Khatami Killed: मध्यपूर्वेतील युद्ध भीषण वळणावर पोहोचले असताना इराणला आज मोठा धक्का बसला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) गुप्तचर प्रमुख मेजर जनरल माजिद खातमी यांचा आज (6 एप्रिल) पहाटे अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. इराणच्या सरकारी माध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून खातमी यांना 'शहीद' घोषित केले.

ब्रिगेडियर जनरल माजिद खातमी यांची गेल्या वर्षी जून 2025 मध्ये गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे पूर्ववर्ती मोहम्मद काझमी आणि उपप्रमुख हसन मोहाकिक यांचाही इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला होता, त्यानंतर खातमी यांनी या विभागाची धुरा सांभाळली होती. आयआरजीसीमध्ये त्यांना गुप्तचर कामाचा मोठा अनुभव होता. संरक्षण मंत्रालयात त्यांनी 'इंटेलिजेंस प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन'चे प्रमुख म्हणूनही काम केले होते. खातमी हे इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू कमांडर मानले जात होते. त्यांच्या मृत्यूनंतर इराणच्या लष्करी आणि गुप्तचर यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे.

एकिकडे इराणच्या बड्या लष्करी नेत्यांवर हल्ले होत असताना, दुसरीकडे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानचे लष्करी प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अमेरिका (America) आणि इराण या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून युद्धविरामाचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त समोर आले. या प्रस्तावावर दोन्ही देशांच्या वार्ताकारांची चर्चा सुरु आहे. जर या प्रस्तावावर सहमती झाली, तर पुढील 15 ते 20 दिवसांत युद्धविराम लागू होऊ शकतो. या प्रस्तावात मध्यपूर्वेतील हल्ले थांबवणे आणि होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची अट घालण्यात आली आहे.

पाकिस्तानने दिलेल्या या प्रस्तावावर इराणने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तेहरानच्या मते, केवळ तात्पुरत्या युद्धविरामासाठी होर्मुजची सामुद्रधुनी खुली केली जाणार नाही. इराणने स्पष्ट केले की, कोणत्याही अटी मान्य करण्यापूर्वी त्यांना पूर्ण सुरक्षा आणि ठोस कराराची आवश्यकता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुजची सामुद्रधुनी खुली न केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला असतानाच इराणने (Iran) ही ताठर भूमिका घेतल्याने युद्धविरामाच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. खातमी यांच्या हत्येनंतर इराण आता शांतता करारावर स्वाक्षरी करतो की प्रतिहल्ला करतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT