Basra Dainik Gomantak
ग्लोबल

इराक हादरलं ! बसरा शहराजवळ बॉम्बस्फोटात चार ठार, 20 जण जखमी

इराकच्या (Iraq) दक्षिणेकडील बसरा शहराच्या मध्यभागी झालेल्या भीषण स्फोटात (Blast in Iraq) चार जण ठार झाले

दैनिक गोमन्तक

इराकच्या (Iraq) दक्षिणेकडील बसरा शहराच्या मध्यभागी झालेल्या भीषण स्फोटात (Blast in Iraq) चार जण ठार झाले. इराकी लष्कराने (Iraqi military) यासंबंधीची माहिती दिली आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात लष्कराने सांगितले की, हा बॉम्ब मोटरसायकलमध्ये ठेवण्यात आला होता, त्यामुळे हा जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूला धुराचे लोट पसरले असून आकाशात धुराचे लोटही दिसत होते. लष्कराने पुढे सांगितले की, फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. या स्फोटात अन्य 20 जण जखमी झाल्याचे रॉयटर्सने वृत्त दिले आहे.

दरम्यान, एका वरिष्ठ सुरक्षा स्रोताने Rudaw मीडिया नेटवर्कला सांगितले की, शहराच्या मध्यभागी असलेल्या अल-जुमहौरी रुग्णालयासमोर (Al-Jumhouri Hospital) हा स्फोट झाला, असे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. स्फोटाचा प्रकार आणि स्वरुप तपासण्यासाठी सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा घातला असल्याचे देखील सूत्राने सांगितले. अलिकडच्या वर्षांत बसरामध्ये बॉम्बस्फोटाच्या घटना फार कमी झाल्या आहेत. विशेषत: 2017 मध्ये इस्लामिक स्टेटचा पराभव झाल्यानंतर स्फोट खूप कमी झाले आहेत. मात्र, आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र बसराचे गव्हर्नर असद अल-इदानी यांनी या स्फोटात इस्लामिक स्टेटचा (Islamic State) हात असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले.

इस्लामिक स्टेटवर स्फोट झाल्याचा संशय

10 ऑक्टोबर रोजी झालेल्या संसदेच्या निवडणुकांनंतर इराकमध्ये राजकीय अस्थिरता वाढली आहे, ज्यामध्ये मुक्तादा अल-सद्र हे सर्वात मोठे विजयी म्हणून उदयास आले आहेत. इराणशी एकनिष्ठ असलेल्या शिया सशस्त्र गटांनी त्यांच्या संसदीय जागांपैकी सुमारे दोन तृतीयांश जागा गमावल्या आहेत आणि त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करून निवडणूक निकाल नाकारले आहेत. इराकच्या बसरा शहरात शिया समुदाय बहुसंख्य आहे. यामुळे, हा स्फोट इस्लामिक स्टेटने घडवून आणला असावा, असाही संशय व्यक्त केला जात आहे, कारण ते अनेकदा शिया क्षेत्र आणि शहरांना लक्ष्य करत आहेत.

जुलैमध्ये इराकची राजधानी बगदादच्या उपनगरात रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 10 जण ठार तर 20 जण जखमी झाले होते. इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर शहरातील गर्दीच्या बाजारपेठेत हा स्फोट झाला. हा स्फोट ईद-उल-अझाच्या एक दिवस आधी झाला, जेव्हा लोक बाजारात खरेदीमध्ये व्यस्त होते. यापूर्वी एप्रिलमध्ये सदर शहरात कार बॉम्बस्फोटात किमान चार जण ठार झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT