इराकमध्ये (Iraq) काल पुन्हा एकदा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (Islamic State) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून याआधी मंगळवारी इराकमधील (Iraq) दक्षिणेकडील बसरा (Basrah) शहरात भीषण स्फोट झाला होता या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचे इराकी लष्कराने सांगितले होते. त्यामुळे एक जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटानंतरही संशयाच्या सुया इस्लामिक स्टेटकडेच गेल्या. मात्र, तोपर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नव्हती.(Iraq bomb blast: 11 killed bomb blast Islamic State accepted the attack responsibility)
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये स्फोटानंतर सर्वत्र धुराचे लोट दिसत असल्याचे दिसत आहे. एका वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात सांगितले की, बसरा शहरातील स्फोटात 20 लोक जखमी झाले आहेत तर शहराच्या मध्यभागी असलेल्या अल-जुमहौरी रुग्णालयासमोर हा स्फोट झाल्याचे लष्कराने सांगितले आहे .त्याचवेळी, स्फोटानंतर लगेचच घटनास्थळाला वेढा घातला गेला आणि त्यानंतर या स्फोटामागील कारणाचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. बसराचे गव्हर्नर असद अल-इदानी यांनी सांगितले की, या स्फोटात इस्लामिक स्टेटचा हात होता.
तर दुसरीकडे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरोधात सुरू असलेली मोहीम संपुष्टात आली आहे. आता अमेरिकन सैन्य इराकी सैन्याला प्रशिक्षण आणि सल्ला देण्याच्या भूमिकेकडे परत येईल. इराकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी गुरुवारी ही माहिती दिली असून मिशनच्या भूमिकेत बदल झाल्याची माहिती इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधिमी यांनी जुलैमध्ये वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली तेव्हा देण्यात आली होती.
त्याच वेळी, अमेरिकन सैनिकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी इराकी सरकारवर आधीच दबाव होता. इराण समर्थित गटांच्या वतीने देशातून सैनिकांना हाकलून देण्याबाबत सतत चर्चा होत होती. इराकमध्ये सध्या 2500 सैनिक तैनात आहेत.यावरच माहिती देताना इराकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कासेम अल-अराझी यांनी ट्विट केले आहे की, "आम्ही अधिकृतपणे कोलिशन फोर्सेस कॉम्बॅट मिशनच्या समाप्तीची घोषणा करत आहोत. इराकी सैन्याचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि क्षमता वाढविण्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय युतीशी संबंध चालू आहेत."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.