Iranian Youth and donald trump Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: "40 हजार लोकांचा नरसंहार झालाय", डोनाल्ड ट्रम्प यांना साद घालत इराणी तरुणानं संपवलं जीवन; 10 मिनिटांचा थरारक निरोप व्हायरल

Iranian Youth Last Video Message: अमेरिकेसोबत सुरु असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Iranian Youth Last Video Message: अमेरिकेसोबत सुरु असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. इराणमधील एका तरुणाने सोशल मीडियावर आपला शेवटचा व्हिडिओ पोस्ट करुन आत्महत्या केली असून, या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. पूरिया हमीदी असे या तरुणाचे नाव असून त्याने आपल्या 10 मिनिटे 44 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक आर्त साद घातली आहे.

इराणमधील धार्मिक राजवटीशी कोणताही राजनैतिक करार करु नका, अशी कळकळीची विनंती हमीदीने ट्रम्प यांना केली. इराणमध्ये सुरु असलेल्या निदर्शकांवरील हल्ल्यांकडे आणि अत्याचारांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्याने या व्हिडिओमध्ये नमूद केले.

इराणमधील (Iran) धार्मिक राजवटीशी कोणताही राजनैतिक करार करु नका, अशी कळकळीची विनंती हमीदीने ट्रम्प यांना केली. इराणमध्ये सुरु असलेल्या निदर्शकांवरील हल्ल्यांकडे आणि अत्याचारांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्याने या व्हिडिओमध्ये नमूद केले.

इराणच्या बुशेहर या बंदर शहरात राहणाऱ्या हमीदीने 5 फेब्रुवारी रोजी आपल्या 'PoorY X' या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट केला. "जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर समजा मी आता या जगात नाही," अशा शब्दांत त्याने आपल्या निरोपाच्या भाषणाची सुरुवात केली. इराणमधील परिस्थिती रशिया-युक्रेन किंवा इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धापेक्षाही भयंकर असल्याचे सांगताना त्याने दावा केला की, तिथे 40 हजारहून अधिक लोकांची हत्या झाली आहे. इंग्रजीमध्ये रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, "हा माझा त्याग आहे – कृपया माझ्या देशाला मुक्त करा." त्याच्या मते, इराणी राजवटीशी कोणताही करार करणे हा मारल्या गेलेल्या हजारो निष्पाप लोकांचा विश्वासघात ठरेल.

हमीदीने आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर असलेला विश्वास व्यक्त केला. त्याने म्हटले की, ट्रम्प यांनी इराणी जनतेला निषेध सुरु ठेवण्याचे आवाहन केले होते आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून ते केले. मात्र, सशस्त्र दलांशी निशस्त्र जनता लढू शकत नाही. बाह्य मदतीशिवाय किंवा परदेशी हस्तक्षेपाशिवाय इराणी लोक या इस्लामिक राजवटीविरुद्ध जिंकू शकत नाहीत, असेही त्याने स्पष्टपणे सांगितले. त्याने निर्वाणीचे शब्द उच्चारताना म्हटले की, "इराणवर अमेरिकेचा हल्ला होणे हीच आता आमची शेवटची आशा आहे." त्याने निर्वासित नेते रेजा पहलवी यांच्याबद्दलही आपले समर्थन व्यक्त केले आणि तेच अंतरिम सरकारसाठी योग्य पर्याय असल्याचे सांगितले.

व्हिडिओच्या शेवटी हमीदी अत्यंत भावूक झालेला दिसला. तो म्हणाला की, त्याला भूक लागत नाही, झोप येत नाही आणि ज्या देशात भविष्यच नाही तिथे जन्माला आल्याच्या वेदनेमुळे तो रडूही शकत नाही. आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ मिळावा यासाठीच आपण हे बलिदान देत असल्याचे सांगून त्याने इराणी जनतेला एकमेकांचे साथ देण्याचे आवाहन केले.

या व्हिडिओनंतर हमीदीने स्वतःचे जीवन संपवले. इराण सरकारने सध्या विरोधकांवर आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर कारवाई तीव्र केली असतानाच ही घटना घडली आहे. एकीकडे नोबेल विजेत्या नरगिस मोहम्मदी यांची शिक्षा वाढवली जात असताना आणि दुसरीकडे असंतुष्ट नेत्यांच्या नातेवाईकांना अटक केली जात असताना हमीदीच्या या बलिदानाने इराणमधील अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Dance: सूर्याचा 'धुरंधर' अवतार! अक्षय खन्नाच्या 'सिग्नेचर' स्टेपवर धरला ठेका; धमाकेदार डान्सवर चाहते फिदा VIDEO

Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Leopard in Camurlim: कामुर्लीत बिबट्याचा वावर; वासराची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Horoscope: एप्रिल 2026 मध्ये कोणाला मिळणार कुटुंबाची साथ? कोणाची होणार ताटातूट? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

SCROLL FOR NEXT