Iranian Warship Attack Dainik Gomantalk
ग्लोबल

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Torpedo Attack Iranian Vessel: हिंदी महासागर क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी बातमी समोर आली.

Manish Jadhav

Torpedo Attack Iranian Vessel: हिंदी महासागर क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी बातमी समोर आली. श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ इराणची महत्त्वाची युद्धनौका 'आयआरआयएस डेना' एका भीषण पाणबुडी हल्ल्यानंतर समुद्रात बुडाली. या विनाशकारी हल्ल्यामुळे जहाजावरील तब्बल 101 कर्मचारी बेपत्ता झाले असून 78 जण गंभीर जखमी झाले आहेत. श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने बुधवारी (3 मार्च) झालेल्या या घटनेला दुजोरा दिला असून या हल्ल्याने जागतिक नौदलांमध्ये खळबळ उडाली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे 'आयआरआयएस डेना' हे 'मौज-क्लास' फ्रिगेट (युद्धनौका) होते. ही युद्धनौका भारतात विशाखापट्टणम येथे आयोजित 'मिलन 2026' (MILAN 2026) या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी होऊन पुन्हा इराणच्या दिशेने परतत होती. जहाजावर एकूण 180 कर्मचारी तैनात होते. बुधवारी सकाळी श्रीलंकेच्या सागरी हद्दीत असताना या युद्धनौकेवर अचानक पाणबुडीतून टॉरपेडो हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर जहाजातून तातडीने आणीबाणीचा (Emergency Message) संदेश श्रीलंकेच्या नौदलाला पाठवण्यात आला. मात्र, जहाजाचे झालेले नुकसान इतके मोठे होते की काही वेळातच ही युद्धनौका समुद्रात गडप झाली.

मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम

श्रीलंकेच्या नौदलाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शोध आणि बचाव मोहीम (Rescue Operation) सुरु केली. श्रीलंकेच्या हवाई दलाची विमाने आणि नौदलाची जहाजे घटनास्थळी दाखल झाली आहेत. आतापर्यंत 78 जखमी जवानांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, अद्याप 101 जवानांचा पत्ता लागलेला नाही. समुद्रातील हवामान आणि लाटांच्या वेगामुळे शोध मोहिमेत अडथळे येत आहेत.

हल्ल्यामागे कोणाचा हात?

इराण सध्या विविध प्रादेशिक संघर्षांमध्ये गुंतलेला असताना हा हल्ला नेमका कोणी केला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कोणत्याही देशाने किंवा दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, विशाखापट्टणम येथील आंतरराष्ट्रीय सराव आटोपून परतणाऱ्या जहाजावर असा हल्ला होणे, हे समुद्री सुरक्षेसाठी मोठे आव्हान मानले जात आहे. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून इराण सरकारकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. 'मिलन 2026' हा भारताचा महत्त्वाचा नौदल सराव असल्याने या घटनेचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय राजकारणाशी जोडले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gen Z Jantar Mantar Protest: ताठर सरकार अन्‌ युवकांचा निर्धार

Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; CWG 2026 मध्ये भारताला मिळवून दिलं पहिलं 'गोल्ड मेडल' VIDEO

खरी कुजबूज: बोरकर 'त्या' व्हिडिओवर गप्प का?

Horoscope: शिवकृपेने खुलणार यशाचे दरवाजे! 'या' राशींसाठी सोमवार ठरणार अत्यंत शुभ; सुख, समृद्धी सह प्रत्येक कार्यात मिळणार यश

Goa Job Promise Robbery Case: 24 लाखांच्या दरोड्याचा आरोपी पुन्हा गजाआड! 18 वर्षांच्या तरुणाची फसवणूक; कोलवाळ पोलिसांकडून एकाला अटक

SCROLL FOR NEXT