Iran Leader Dainik Gomntak
ग्लोबल

Iran: भीषण बॉम्बस्फोटांचा बदला इराण घेणार, जाणून घ्या कोणी केले बॉम्बस्फोट; वर्चस्वासाठी पुन्हा...

Iran News: इराणचे माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ 3 जानेवारी रोजी दोन बॉम्बस्फोट झाले.

Manish Jadhav

Iran News: इराणचे माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ 3 जानेवारी रोजी दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट इतके भीषण होते की, शेकडो लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 150 हून अधिक लोक जखमी झाले. विशेष म्हणजे, या भीषण स्फोटाची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने घेतली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत नव्या युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. कारण या भीषण बॉम्बस्फोटांनंतर इराणने आयएसकडून बदला घेण्याची शपथ घेतली आहे. इस्लामिक स्टेटने बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतल्यानंतर मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांमध्ये वर्चस्वासाठी नवे युद्ध सुरु होऊ शकते. इराणवर हल्ला करुन इस्लामिक स्टेटने पुन्हा एकदा इराण, हिजबुल्लाह आणि हुथी बंडखोरांसारख्या संघटनांना खुले आव्हान दिले आहे.

इराण हिजबुल्लाह, हमास आणि हुथींना पाठिंबा देतो

दरम्यान, हमास, हिजबुल्लाह आणि हुथी बंडखोर संघटनांना इराणचा उघड पाठिंबा आहे, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. खरे तर गाझा पट्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या हमासचे हिजबुल्ला आणि इराण समर्थित दहशतवादी संघटना इस्लामिक जिहाद यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिजबुल्लाने एक निवेदन जारी केले होते की, हल्ला करण्यापूर्वी हमासने हिजबुल्लाशी संपर्क साधला होता. इराणही या संघटनांना वेळोवेळी पैसा आणि शस्त्रे देऊन मदत करतो.

ISIS ला सौदी अरेबियाचा पाठिंबा मिळतो

इराणमधील परिस्थितीच्या अगदी उलट, इराक आणि सीरियामध्ये दहशत पसरवणाऱ्या इस्लामिक स्टेट म्हणजेच इसिसला सौदीचा पाठिंबा मिळतो. केवळ सौदीच नाही तर कुवेत, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांची सरकारेही ISIS ला छुपा पाठिंबा देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT