Ibrahim Raisi Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Iran Tensions: ''...आम्ही तुमचा न्यूक्लियर प्लांट नष्ट करु''; संघर्षादरम्यान इराणची इस्त्रायलला खुली धमकी

Israel Iran Tensions: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नसताना इस्त्रायल आणि इराण एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Manish Jadhav

Israel Iran Tensions: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नसताना इस्त्रायल आणि इराण एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सीरियातील इराणच्या दूतावासावर इस्त्रायलने केलेला हल्ला या दोघांच्या संघर्षाचे मूळ कारण ठरले. या हल्ल्यात इरणच्या लष्कर प्रमुखासह 12 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर इरणनेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची शपथ घेऊन इस्त्रायलच्या शहरांवर अनेक मिसाइल डागली. यातच आता, इस्रायल इराणवर हल्ला करण्याची शक्यता असताना इराणने उघडपणे धमकी दिली आहे. इराणच्या आण्विक संरक्षण आणि सुरक्षा दलाच्या प्रमुखाने ही धमकी दिली आहे. जर चुकूनही इस्रायलने इराणच्या आण्विक साइटला लक्ष्य केले तर इराण इस्रायलची आण्विक साइट नष्ट करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सीरियातील दमास्कस येथे इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. अलीकडेच इराणने इस्रायलवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करुन मध्यपूर्वेत खळबळ उडवून दिली. त्यामुळे इस्रायलही लवकरच बदला घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, इराणकडून उघड धमकी इस्रायलला आणखी चिथावू शकते.

काय धमकी दिली?

इराणच्या आण्विक संरक्षण आणि सुरक्षा दलाचे प्रमुख जनरल अहमद हकताब यांनी इस्रायलला ही धमकी दिली आहे. इराण आपल्या आण्विक धोरणात बदल करेल, असे त्यात म्हटले आहे. हकताब यांनी म्हटले की, इस्रायलने इराणच्या आण्विक साइटला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही इस्रायलची आण्विव साइट नष्ट करु.

इस्रायलच्या आण्विक साइटची संपूर्ण माहिती आहे

इराणचे जनरल अहमद हकताब यांनी दावा केला की, त्यांच्याकडे इस्रायलच्या आण्विक साइटची संपूर्ण माहिती आहे. प्लांट कुठे आहे हे देखील आम्हाला माहित आहे. इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे बोट ट्रिगरवर आहे. इस्त्रायलने इराणविरुद्ध अजून काही करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

इस्रायलही इराणला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी करतोय

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायल पूर्णपणे तयार आहे. अलीकडेच इस्रायलच्या वॉर कॅबिनेटनेही इराणला चोख प्रत्युत्तर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, या शियाबहुल इराणला कसे आणि केव्हा प्रत्युत्तर दिले जाईल हे अद्याप ठरलेले नाही. विशेष म्हणजे या वॉर कॅबिनेटमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, संरक्षण मंत्री योव गॅलेंट आणि माजी लष्करप्रमुख बेनी गँट्झ यांचा समावेश आहे. वॉर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर इस्रायल इराणवर मोठा हल्ला करु शकतो, असे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

SCROLL FOR NEXT