Mojtaba Khamenei Dainik Gomantak
ग्लोबल

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

Mojtaba Khamenei First Speech After Ceasefire: अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने तात्पुरता युद्धविराम झाल्यानंतर इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी मोठे वक्तव्य केले.

Manish Jadhav

Mojtaba Khamenei First Speech After Ceasefire: अमेरिका-इराण यांच्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने तात्पुरता युद्धविराम झाल्यानंतर इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी मोठे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने जागतिक राजकारणात नवा संदेश गेला असून त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. खामेनेई यांनी स्पष्ट केले की, इराणला युद्ध नको आहे, परंतु आम्ही आमचा अधिकार कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. शत्रूला कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही. इराणवर हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. इराण आता जगातील सर्वात मोठी शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खामेनेई यांनी आपल्या भाषणात दावा केला की, हे युद्ध इराणने जिंकले असून त्यांनी अमेरिकेला आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडले. एवढचं नाहीतर त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला इशारा देताना स्पष्टपणे म्हटले की, इराणवर (Iran) पुन्हा हल्ला करण्यापूर्वी आता 100 वेळा विचार करावा लागेल, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

विशेष म्हणजे, इराण आता सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या 'होर्मुज सामुद्रधुनीचा' वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. "खूप झाली भलाई, आता होर्मुजमधून आम्ही पैसा कमावू," असे म्हणत त्यांनी जागतिक व्यापारावर इराणचे वर्चस्व निर्माण करण्याचे संकेत दिले. तसेच, देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या रक्ताची किंमत शत्रूकडून वसूल केली जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

दुसरीकडे, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी इस्रायलवर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केला. पेजेश्कियान म्हणाले की, लेबनानवर इस्रायलने केलेले हल्ले त्वरित थांबले पाहिजेत. जर इस्रायल मागे हटला नाही, तर पाकिस्तानमध्ये होणारी शांतता चर्चा निरर्थक ठरेल. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे लेबनानमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, 1000 हून अधिक जण जखमी झाले आहेत, तर लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले. या परिस्थितीवर संताप व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, एकीकडे अमेरिका शांततेची भाषा करत आहे आणि दुसरीकडे त्यांचा मित्र देश इस्रायल हल्ले करत आहे.

इराणी अध्यक्षांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, नेतन्याहू यांची मनमानी अमेरिकेला (America) महाग पडेल. सीजफायर झाला असला तरी इराणच्या सैन्याची बोटे अजूनही 'ट्रिगर'वरच आहेत, हे इस्रायल आणि अमेरिकेने विसरु नये. कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा युद्धविरामाचा भंग इराण सहन करणार नाही. जर इस्रायलने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत, तर इराणला देखील हल्ल्याचे सडेतोड उत्तर द्यावे लागेल.

एकूणच, इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या आणि अध्यक्षांच्या या विधानांमुळे आगामी काळात आखाती देशांमधील तणाव कमी होणार की अधिक वाढणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इराणने आपली शक्ती वाढवण्याचा आणि जागतिक व्यापारावर नियंत्रण मिळवण्याचा जो निर्धार व्यक्त केला आहे, त्याचे मोठे परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वकील उपस्थित होते, मग उलटतपासणी का केली नाही"? 5 वर्षांनंतर 'त्या' प्रकरणी शहाणपण सुचलेल्या संशयिताला कोर्टानं झापलं

रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन! एप्रिल महिन्यात सरकारी तिजोरी झाली तुडुंब; 2.11 लाख कोटींच्या नेट रेव्हेन्यूसह महसुलात मोठी वाढ

"तुझ्या वडिलांना फोडलं, तसचं तुलाही फोडू"; माजोर्डातील 'त्या' घटनेप्रकरणी FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार; धमकी देणाऱ्यांना दणका!

US Iran War: ''दादागिरी खपवून घेणार नाही, सर्वनाश करु'', ट्रम्प यांच्या धमकीवर मोजतबा खामेनेईंचा पलटवार; आखाती देशांत युद्धाचं सावट कायम

Goa Crime: पीडिताच ठरली ‘फितूर’, आरोपीशी केलं लग्न, अत्याचार प्रकरणी कोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता; काय नेमंक प्रकरण?

SCROLL FOR NEXT