Strait Of Hormuz Dainik Gomantak
ग्लोबल

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

Iran Strait of Hormuz Naval Mines Map: जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' या सागरी मार्गावर इराणने आता आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी एक भयानक खेळी खेळली.

Manish Jadhav

Iran Strait of Hormuz Naval Mines Map: जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' या सागरी मार्गावर इराणने आता आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी एक भयानक खेळी खेळली. आखाती देशांतून होणाऱ्या तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर इराणने एक नवे 'जाळे' विणले असून त्यामुळे जागतिक व्यापारात प्रचंड खळबळ उडाली. इराणने नुकताच एक अधिकृत नकाशा जारी केला असून त्यामध्ये जहाजांसाठी नवीन 'सुरक्षित कॉरिडॉर' जाहीर केला. मात्र, या सुरक्षिततेच्या नावाखाली इराणने व्यापारी जहाजांकडून तब्बल 16 कोटी रुपयांपर्यंतची (20 लाख डॉलर्स) अव्वाच्या सव्वा फी वसूल करण्यास सुरुवात केली.

इराणने (Iran) प्रथमच अधिकृतपणे हे मान्य केले की, या भागातील पारंपरिक व्यापारी मार्ग आता सुरक्षित राहिलेले नाहीत. इराणने जारी केलेल्या नकाशानुसार, या सागरी मार्गावर मोठ्या प्रमाणावर 'नेव्हल माईन्स' म्हणजेच पाण्याखालील सुरुंग पेरण्यात आले आहेत. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, इराणने या परिसरात 'महाम-3' आणि 'महाम-7' श्रेणीतील डझनभर घातक नेव्हल माईन्स पेरले आहेत. हे पाण्याखाली लपलेले असे स्फोटक आहेत, जे कोणत्याही महाकाय जहाजाला काही क्षणांत उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवतात. या धोक्याची भीती दाखवून इराण आता जगाला आपल्या तालावर नाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

इराणच्या नवीन नियमांनुसार, आता व्यापारी जहाजांना इराणच्या सागरी सीमेच्या अगदी जवळून प्रवास करणे अनिवार्य करण्यात आले. इराण प्रशासनाचे म्हणणे आहे की, त्यांच्या किनारपट्टीजवळून जाणारा मार्गच केवळ या माईन्सपासून सुरक्षित आहे. मात्र, ही 'सुरक्षितता' विनामूल्य नाही. अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित जहाजांना वगळून इतर देशांच्या जहाजांना संरक्षण देण्याचे आश्वासन इराणने दिले, परंतु त्यासाठी प्रत्येक जहाजाला कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गावर कब्जा करण्याचा आणि जागतिक व्यापाराच्या माध्यमातून मोठी कमाई करण्याचा इराणचा एक पूर्वनियोजित कट आहे.

जर जहाजांनी इराणने आखून दिलेल्या या नवीन मार्गाचे पालन केले नाही, तर त्यांना समुद्रात पेरलेल्या सुरुंगांचा थेट सामना करावा लागण्याची भीती आहे. जागतिक व्यापारासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक मानली जात आहे, कारण जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी सुमारे 20 टक्के व्यापार याच मार्गावरुन होतो. जर या मार्गावरील तणाव असाच वाढत राहिला आणि इराणने आपली 'वसुली' सुरुच ठेवली, तर आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिका (America) आणि मित्र राष्ट्रांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून आगामी काळात समुद्रातील हे युद्ध जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का देऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

Viral Video: 'दुचाकी की चालतं-फिरतं मृत्यूचं जाळं', चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बापाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल

Goa Panchayat Construction : कचरा कंत्राटदारांवर आता 'जीपीएस'ची नजर; विकसित गोवा पंचायत संमेलनात मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन!

Lakshmi Narayan Rajyog: "बुध-शुक्राची जुळली युती, लक्ष्मी नारायण योगाची प्राप्ती!" परदेश प्रवासासोबत अचानक धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT