IRGC Seizes Indians Ships Near Hormuz Dainik Gomantak
ग्लोबल

इराणची आक्रमक खेळी! भारताकडे येणाऱ्या जहाजावर केला कब्जा, सागरी व्यापारावर युद्धाचं सावट; नेव्हिगेशन सिस्टीम हॅक केल्याचा दावा

IRGC Seizes Indians Ships Near Hormuz: मध्यपूर्वेतील तणाव आता पराकोटीला पोहोचला असून इराणने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेला आव्हान दिले.

Manish Jadhav

IRGC Seizes Indians Ships Near Hormuz: मध्यपूर्वेतील तणाव आता पराकोटीला पोहोचला असून इराणने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेला आव्हान दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवल्याची घोषणा करुन काही तास उलटत नाहीत तोच, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने बुधवारी दोन व्यापारी जहाजांवर हल्ला करत ती जप्त केली.

विशेष म्हणजे, यातील एक जहाज थेट गुजरातमधील मुंद्रा बंदराच्या दिशेने येत होते. या घटनेमुळे आता भारत (India) आणि इराणमधील राजनैतिक संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात होर्मुझच्या समुद्रधुनीत भारतीय ध्वज असलेल्या जहाजावर हल्ला झाला होता, ज्यानंतर भारताने इराणच्या राजदूतांना पाचारण करुन कडक शब्दांत निषेध नोंदवला होता.

इराणी सरकारी टेलिव्हिजनने दिलेल्या माहितीनुसार, पनामाचा ध्वज असलेले 'एमएससी फ्रान्सेस्का' आणि लायबेरियाचा ध्वज असलेले 'एपामिनोड्स' ही दोन जहाजे सध्या इराणच्या ताब्यात असून त्यांना इराणी किनारपट्टीवर नेण्यात आले आहे. याशिवाय 'युफोरिया' नावाचे ग्रीक जहाजही इराणच्या निशाण्यावर होते आणि ते सध्या इराणच्या किनाऱ्याजवळ अडकून पडले आहे.

'इंडिया टुडे'ने मॅरिटाइम ट्रॅफिक डेटाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, 'एपामिनोड्स' हे जहाज दुबईहून गुजरातच्या मुंद्रा बंदराकडे येत होते. या जहाजांकडे आवश्यक परवाने नव्हते आणि त्यांनी नेव्हिगेशन सिस्टीममध्ये फेरफार करुन सागरी सुरक्षेला धोका निर्माण केला, असा दावा इराणच्या नौदलाने केला. 'युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स'ने (UKMTO) या हल्ल्याला दुजोरा दिला असून जहाजावरील कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेचे पडसाद जागतिक बाजारपेठेवरही उमटले असून कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या जवळ पोहोचल्या आहेत. इराणने स्पष्ट इशारा दिला की, अमेरिकेने त्यांची नाकेबंदी हटवली नाही तर भविष्यात बळाचा वापर केला जाईल. खरे तर, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने ओमानच्या आखातात इराणचे दोन मालवाहू जहाजे ताब्यात घेतली होती. इराणची ही ताजी कारवाई त्याच घटनेचा बदला असल्याचे मानले जात आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या वाढत्या दबावामुळे इराणने या महत्त्वाच्या जलमार्गावर कडक निर्बंध लादले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जागतिक व्यापारावर आता इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मोठे संकट ओढवले असून आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारतासाठी हे प्रकरण अधिक गंभीर आहे कारण इराणच्या (Iran) या कृत्यामुळे देशाच्या सागरी व्यापाराला आणि ऊर्जा सुरक्षेला थेट धोका निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT