Israel-Iran Tensions: इस्रायल आणि इराण यांच्यातील वैर कुणापासून लपलेले नाही. इस्रायल अनेक वर्षांपासून सीरियात इराणशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करत आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायल-हमास युद्ध सुरु झाल्यानंतर असे हल्ले सातत्याने वाढत आहेत. या मालिकेत शुक्रवारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स नेव्हीचा एक सदस्य इस्रायलच्या संशयास्पद हल्ल्यात ठार झाला. कर्नल रजा झारेई असे या सदस्याचे नाव आहे. तो सीरियामध्ये लष्करी सल्लागार म्हणून काम करत होता. इराणची अधिकृत वृत्तसंस्था IRNA ने ही माहिती दिली आहे. इस्रायलचे लक्ष्य सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये आहे, मात्र यावेळी सीरियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर शहर टार्टसवर हल्ला करण्यात आला आहे.
दरम्यान, इराणी रिव्होल्युशनरी गार्ड किंवा IRGC ही इराणमधील एक प्रमुख लष्करी, राजकीय आणि आर्थिक शक्ती आहे. इतर इराणी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, कर्नल रजा झारेई हे लेबनॉनच्या इराण समर्थित हिजबुल्ला गटाच्या दोन दहशतवाद्यांसोबत ठार झाले. सीरियन सरकारला पाठिंबा देणाऱ्या युतीमधील एका वरिष्ठ सुरक्षा स्त्रोताने रॉयटर्सला सांगितले की, टार्टसच्या किनारपट्टी भागात इराणी सैन्याने वापरलेल्या इमारतीवर केलेल्या हल्ल्यात झारेई मारला गेला. इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसच्या आसपासच्या भागात हल्ले केले आहेत, परंतु टार्टसमध्ये हल्ले फारच कमी झाले आहेत. हल्ल्याबद्दल विचारले असता, इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी परदेशी अहवालांवर भाष्य केले नाही.
रॉयटर्सने फेब्रुवारीमध्ये नोंदवले की, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने अनेक प्राणघातक इस्रायली हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सीरियामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची तैनाती कमी केली होती आणि तिथे त्यांचे वर्चस्व राखण्यासाठी सहयोगी शिया मिलिशियावर अधिक अवलंबून होते. इस्रायल आणि सीरियाचा इतिहास वाचला तर लक्षात येईल की, या दोघांमधील हे युद्ध नवीन नाही. 2011 मध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद सत्तेवर असताना दोन्ही देशांमध्ये गृहयुद्ध सुरु झाले. तेव्हापासून, इस्रायलने सीरियावर शेकडो हवाई हल्ले केले आहेत, प्रामुख्याने इराण समर्थक शक्ती, विशेषत: हिजबुल्लाह आणि सीरियन आर्मी यांच्यावर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.