donald trump and mojtaba khamenei Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

Iran Oman New Strait of Hormuz Shipping Route: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे होर्मुजची सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली असल्याचा दावा करत असले, तरी इराणने त्यांचा हा दावा फेटाळून लावत अमेरिकेची कोंडी करण्याची मोठी तयारी सुरु केली आहे.

Manish Jadhav

Iran Oman New Strait: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे होर्मुजची सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली असल्याचा दावा करत असले, तरी इराणने त्यांचा हा दावा फेटाळून लावत अमेरिकेची कोंडी करण्याची मोठी तयारी सुरु केली आहे. ट्रम्प वारंवार नकाशा जाहीर करुन होर्मुज सामुद्रधुनीवर अमेरिकेचे नियंत्रण असल्यासारखे भासवत असले, तरी प्रत्यक्ष पाहाता तिथून रोज अवघी सात ते आठ जहाजेच प्रवास करत आहेत. आता इराण येत्या काही दिवसांत ओमानच्या सहकार्याने होर्मुजच्या सामुद्रधुनीसाठी एका नवीन सागरी मार्गाची घोषणा करणार असून, यामुळे अमेरिकेच्या दाव्यांमधील हवा निघणार असल्याचे निश्चित मानले जाते.

इराणचे (Iran) सर्वोच्च सुरक्षा अधिकारी मोहसेन रेझाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ एका मोठ्या प्रतिबंधित क्षेत्राची घोषणा केली जाणार आहे. हे नवीन प्रतिबंधित क्षेत्र अमेरिकन नौदलाच्या नाकेबंदीपासून सुरु होऊन थेट पारसच्या आखाताच्या काही भागांपर्यंत पसरलेले असेल. या क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणाऱ्या कोणत्याही जहाजाला थेट प्रतिबंधित यादीत टाकले जाईल.

नुकतेच अमेरिकन सैन्याने इराणच्या तीन तेल टँकरवर हल्ला करुन ते नष्ट केल्यानंतर, इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी अमेरिकेला तीव्र इशारा दिला. ट्रम्प यांचा होर्मुज खुले असल्याचा दावा हा एक 'मोठा गोड गैरसमज' असल्याचे सांगत त्यांनी युद्धाचे नियम आता बदलले असल्याचे स्पष्ट केले.

सध्या ओमानजवळील एका सागरी मार्गावरुन अमेरिका अवघ्या पाच ते सहा जहाजांना जाण्याची परवानगी देते आणि याच जहाजांना इराण लक्ष्य करत आहे. आता इराण आणि ओमान यांच्यात नवीन सागरी मार्गाबाबत नकाशावर सहमती झाली असून, येत्या काही दिवसांत त्यावर स्वाक्षऱ्या करुन ही नवी व्यवस्था औपचारिकपणे लागू केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होर्मुजची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी पुन्हा खुली करण्यात येईल.

दुसऱ्या बाजूला, अमेरिकेचे सचिव स्कॉट बेसेंट यांनी दावा केला की इराणकडे सध्या सुमारे 3 कोटी बॅरल कच्चे तेल आहे. अमेरिकन नौदलाची नाकेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे चीनने अद्याप हे तेल खरेदी केलेले नाही. असे असले तरी, अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपल्या सैनिकांचा कार्यकाळ वाढवून इराणवर दबाव कायम ठेवला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधील वाढता तणाव जागतिक महासागरीय व्यापार आणि इंधनाच्या पुरवठ्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

Porvorim Gun Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण; पोलिसांना चकवा देणारे 'ते' नेमके आहेत तरी कुठे? गोवा पोलिसांची 'स्पेशल टीम' उत्तर-पश्चिम भारतात रवाना

Best Wedding Destination: निसर्गरम्य किनारे अन् रोमँटिक वातावरणाची जादू... गोव्याला 'सर्वोत्तम विवाह स्थळ' पुरस्कार, दिल्लीतील प्रदर्शनात सन्मान

Goa Mercedes Crash: आधी वडिलांना शिवीगाळ करत मारहाण, नंतर जीवघेणा अपघात; चालक विद्याधर प्रभूचा मर्सिडीज 'कार'नामा

Accident News: चालकाचे नियंत्रण सुटले अन् क्षणात खेळ खल्लास! देव दर्शनाहून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात चिमुकल्यासह 6 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT