Iran Israel Attack  X
ग्लोबल

Iran Israel War: इस्राईलसमोर मोठे आव्हान! इराणने वापरला क्लस्टर बाँब; परराष्ट्रमंत्री अराघची युरोप दौऱ्यावर

Iran Israel Attack: इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची हे आज युरोपच्या दौऱ्यावर दाखल झाले असून ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांसह इतर नेत्यांची ते भेट घेणार आहेत.

Sameer Panditrao

जीनिव्हा: इराण आणि इस्राईल यांचे एकमेकांवरील हल्ले सुरू असतानाच इराणने आता यावर राजकीय मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची हे आज युरोपच्या दौऱ्यावर दाखल झाले असून ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांसह इतर नेत्यांची ते भेट घेणार आहेत. संघर्ष सुरू झाल्यापासून युरोप व इराण यांच्यातील ही प्रथमच थेट चर्चा असेल.

अराघची हे आज ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी यांची भेट घेणार आहेत. अराघची यांच्या दौऱ्यामुळे इस्राईल आणि इराण यांच्यात मागील आठवड्यापासून सुरू झालेला संघर्ष थांबविण्याचा एक मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. लॅमी हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिनो यांची भेट घेऊन थेट जीनिव्हामध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे ते अमेरिकेचीही बाजू इराणसमोर मांडण्याची शक्यता आहे.

इस्राईलने आज इराणमधील राश्‍त या शहरावर हल्ले केले. इराणने क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा वापरत अनेक हल्ले निकामी केले असले तरी काही क्षेपणास्त्रे शहराच्या मध्यभागी पडली. या हल्ल्यात येथील क्षेपणास्त्र व रडार यंत्रणाही उद्ध्वस्त झाल्याचे इस्राईलने सांगितले. इस्राईल बरेचसे हल्ले लढाऊ विमानांद्वारे करत असल्याने इराणने आज विमानविरोधी तोफांचा वापर केला. दरम्यान, चेक गणराज्य आणि स्लोव्हाकियाने इराणी दूतावास बंद केला आहे, तर ऑस्ट्रेलियाने इराणमधील आपला दूतावास बंद केला आहे.

दोन आठवड्यात निर्णय घेऊ : ट्रम्प

इराण आणि इस्राईलमधील संघर्षामध्ये अमेरिकी लष्कराला थेट सहभागी करायचे की नाही, याबाबत दोन आठवड्यांत निर्णय घेऊ, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांना चर्चा करण्यासाठी पुरेशी संधी दिली असतानाही त्यांनी एकमेकांवर फक्त हल्ले केले, अशी नाराजी ट्रम्प यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. इराण अणुबाँब तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे कारण सांगत इस्राईलने त्यांच्यावर मागील आठवड्यापासून हल्ले सुरू केले.

इराणने वापरला क्लस्टर बाँब

इराणने गुरुवारी इस्राईलमधील रुग्णालयावर केल्यावर हल्ल्यावेळी क्लस्टर बाँबचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच, क्षेपणास्त्रातील मूळ स्फोटकांचा स्फोट झाल्यानंतर अनेक छोटे बाँब परिसरात विखुरले जाऊन त्यांचाही स्फोट होतो. त्यामुळे इस्राईलकडे आणखी घातक शस्त्रे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे इस्राईलसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. इराणने गुरुवारी अणुभट्टीवर केलेल्या माऱ्यात या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT