Iran Seizes Two Ships 2026 Dainik Gomantak
ग्लोबल

Iran America War: इराणकडून तीन जहाजांवर पुन्हा एकदा गोळीबार, दोन जहाजे घेतली ताब्‍यात; शस्त्रसंधीला अमेरिकेची मुदतवाढ

Iran Seizes Two Ships 2026: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरील शस्त्रसंधी करार वाढविलेला असतानाच, इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डने होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन जहाजांवर गोळीबार केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

दुबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरील शस्त्रसंधी करार वाढविलेला असतानाच, इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डने होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन जहाजांवर गोळीबार केला. तसेच, दोन जहाजे ताब्यात घेतली असून, त्यातील एक जहाज भारताच्या दिशेने येत होते. त्यामुळे अमेरिकेने शस्त्रसंधी केल्यानंतरही संभाव्य तोडग्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या युद्धातील शस्त्रसंधीची मुदत संपण्याला काही तास बाकी असतानाच ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा इस्लामाबादचा नियोजित दौरा आणि इराणी प्रतिनिधींशी होणारी शांतता चर्चा पुढे ढकलली गेली आहे.

दरम्यान, इराणनेही शस्त्रसंधीची मुदत वाढविल्याचे मान्य केले, मात्र चर्चेमध्ये सहभागी होण्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. चर्चेवरील प्रश्न कायम असतानाच, रिव्हॉल्युशनरी गार्डने तीन जहाजांवर गोळीबार केला.

शुक्रवारपर्यंत चर्चा शक्य

इराणबरोबरील शस्त्रसंधीला अनिश्‍चित काळासाठी मुदतवाढ दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज आणखी एक सकारात्मक बातमी दिली आहे. इराणबरोबरील चर्चेची दुसरी फेरी शुक्रवारपर्यंत (ता. २४) कधीही होऊ शकते, असे ट्रम्प यांनी आज सांगितले. आगामी ३६ ते ७२ तासांमध्ये शांतता चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे ट्रम्प यांनी म्‍हटले आहे.

पाकिस्तानकडून आभार

इराणसोबतची शस्त्रसंधी वाढविल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. संघर्ष समाप्त करण्यासाठी दोन्ही बाजूकडून सर्वसमावेशक शांतता करार नक्की होईल, असे शरीफ यावेळी म्हणाले.

सात आठवड्यांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या या युद्धसंघर्षाचा शेवट करण्यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करण्याकरिता इराणच्या नेतृत्वाला वेळ मिळावा, यासाठी शस्त्रसंधीचा कालावधी वाढवला आहे.

- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT