Goa Mining: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात खाणकाम जोरात! 24 ठिकाणी खनिजाचा महालिलाव; सरकारला सुरुवातीलाच मिळणार 200 कोटींचा महसूल

Goa Mining Auction: विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात खाणकाम पुन्हा जोरात सुरू व्हावे, या उद्देशाने आता २४ ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव पुकारण्यात आला आहे.
Goa Mining Auction
Goa MiningDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात खाणकाम पुन्हा जोरात सुरू व्हावे, या उद्देशाने आता २४ ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव पुकारण्यात आला आहे. या लिलावातून सुरुवातीलाच सरकारला सुमारे २०० कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

खाण संचालक नारायण गाड यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, पूर्वी खाणी सुरू असताना टाकाऊ माती म्हणून बाजूला ठेवलेला हा खनिज माल आहे. त्याचा आता लिलाव करण्यात येत आहे. या मालाचा टनातील आकार आणि भारतीय खाण ब्युरोने लिलावाच्या दिवशी ठरवलेला दर यांच्या २० टक्के किमान दर निश्चित करण्यात आला आहे. यातून सरकारला सुरुवातीलाच सुमारे २०० कोटी रुपये मिळतील. त्यानंतर लिलावात मिळालेल्या बोलीनुसार सरकारला अतिरिक्त महसूल प्राप्त होईल.

Goa Mining Auction
Goa Sand Mining: रेती परवाने आणखी लांबणार, नव्‍याने जारी होण्‍याची शक्‍यता धूसर; 'सीआरझेड-4'ची आडकाठी

या टप्प्यात दक्षिण गोव्यातील अनेक डंप्सचा लिलाव पुकारण्यात आला असून, सांगे व धारबांदोडा तालुक्यांत हे डंप्स आहेत. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दक्षिण गोव्यातही खाणकामाला वेग येण्याची शक्यता आहे. ते पुढे म्हणाले की, यापूर्वी पुकारलेल्या डंप्सच्या लिलाव आणि सध्याच्या लिलावात मूलभूत फरक आहे. सर्वोच्च न्यायालयाने २००७ ते २०१२ या कालावधीत झालेले खाणकाम बेकायदा ठरवल्यानंतर सरकारने खनिज माल जप्त केला होता. आजपर्यंत या खनिज मालाचा सुमारे ३० वेळा ई-लिलाव पुकारण्यात आला असून, तो प्रामुख्याने उत्तर गोव्यात झाला आहे.

५५ ते ४५ ग्रेडचा प्रवास

सध्या लिलावासाठी ठेवलेले साठवलेले खनिज कमी प्रतीचे आहे. २००९ पर्यंत ५५ ग्रेडखालील लोहखनिज टाकाऊ माती म्हणून गणले जात होते. आता ही मर्यादा ४५ ग्रेडपर्यंत खाली आणल्यामुळे त्या वेळच्या टाकाऊ मातीला आता बाजारभाव मिळत आहे. सध्या तब्बल ४ कोटी १९ लाख ३६ हजार ३० टन खनिज मातीचा लिलाव पुकारण्यात आला असल्याची माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी दिली.

Goa Mining Auction
Goa Mining: '..अन्यथा खाणपट्टा बोलीला फटका'! निर्यातदार संघटनेचा इशारा; लोहखनिज निर्यातीवर शुल्क जाचक असल्याचा दावा

महत्त्वाच्या तारखा

ई लिलाव सूचनेची प्रसिद्धी : २१ एप्रिल

लिलाव कागदपत्रे विक्री सुरु : २१ एप्रिल

लिलाव कागदपत्र विक्री बंद :२७ एप्रिल

आराखडा सादर करणे, बोली रक्कम भरण्याची शेवटची तारीख :२६ मे

बॅंक हमी सादर करण्याची तारीख :२६ मे सायंकाळी ५ वाजेपर्यंत

तांत्रिक देकार उघडणे : २७ मे

तांत्रिक देकारातील विजेता जाहीर: नंतर जाहीर करणार

प्रत्यक्षातील ई लिलाव सुरू : नंतर जाहीर करणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Uttar Pradesh Youth Death In Goa
 JBR Stone Private Limited
Goa mining
MLA Vijai Sardesai Court Warning
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com